आगीत लाखाचा चारा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:20 PM2019-04-01T22:20:12+5:302019-04-01T22:20:43+5:30
पिंप्री येथील घटना: शॉर्ट सर्कीटमुळे झाले नुकसान, पशूधन बचावले
कजगाव, ता. भडगाव : येथुन जवळच असलेल्या पिंप्री ता.पाचोरा येथील पिंप्री शिवारातील सुभाष सोपानराव पाटील यांच्या शेतातील चाऱ्याच्या शेडला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याने सुमारे एक लाखाचा चारा जळुन खाक झाला. तसेच शेडचे व शेती अवजार व ठिंबक बंडल आदीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याबाबत वृत्त असे की, पिंप्री ता. पाचोरा येथे पत्र्याच्या शेडला शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत अंदाजे एक लाख रूपयाचा चारा व शेती उपयोगी साहित्य व ठिबक चे ५ मोठे बंडल व पंचवीस पत्रांचे शेड असा दोन ते अडीच लाख रुपयांचे साहित्य जळाले. तसेच शेडच्या बाजुला बांधलेली गाय आगीत होरपळली सुदैवाने ती बचावली. इतर पशुधन थोडया अंतरावर असल्याने तेही बचावली अन्यथा मोठे पशुधन या आगीत होळपळले असते.
पिंप्री येथील शेतकरी सुभाष सोपान पाटील यांचे पिंप्री शिवारात सहा एकर शेत असून त्या शेतात त्यांनी शाळू व मक्याचा चारा व हरभऱ्याची कुट्टी जनावरांसाठी साठवून ठेवली होती. मात्र शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या या आगीत शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदरील घटना सर्वत्र वाºयासारखी पसरल्या नंतर ग्रामस्थांची गर्दी झाली होती. या घटनेने या शेतकºयाच्या डोळ्यात अश्रू आले होते. आगीचे लोळ प्रचंड प्रमाणावर असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थानी एकच धावपळ केली. दिसेल तेथून पाणी आणून आगीवर टाकण्यात आले. प्रमोद पाटील व अर्जुन पाटील यांच्या टँकरने अनेक फेºया करीत पाणी ओतल्यावर तब्बल तीन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.