जळगाव : निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणी कार्यक्रम राबविला जात असला तरी या नोंदणीची जबाबदारी ज्या बीएलओंवर आहे, ते आपले काम सोडून घरी झापलेले राहतात असे गंभीर आरोप करीत हे अधिकारी मतदारांपर्यंत पोहचत नसण्यासह वेगवेगळ््या तक्रारींचा पाढा शुक्रवारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या समोर विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी वाचला.मतदार यादीच्या विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या आढाव्यासंदर्भात शुक्रवारी दुपारी नियोजन भवनात विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या उपस्थित बैठक झाली. या वेळी माने यांच्यासह आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीला मतदार यादीच्या विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रमासह जिल्ह्यातील मतदार नोंदणीविषयी माहिती सादर करण्यात आली. त्यानंतर विविध राजकीय पक्षांना या कार्यक्रमाबाबत मत मांडण्यास सांगितले असता त्यात त्यांनी ईव्हीएमसह विविध विषयांवर सूचना सांगत बीएलओंबाबत नाराजी व्यक्त केली.जनजागृतीचा अभाववरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सुरुवातीला जिल्हाधिकाºयांच्या कार्याचे कौतूक केले, मात्र मतदार नोंदणी कार्यक्रमात बीएलओ मतदारांपर्यंत पोहचत नसल्याची बाब सर्वांसमोर मांडली. बीएलओंनी घरोघरी जाऊन नोंदणीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असताना तसे होत नसल्याचे सांगून वरणगाव येथे मतदार नोंदणी जनजागृतीचा अभाव असल्याचे नमूद केले. बीएलओंनी यात काम केले तर गावात मतदार नोंदणीस आणखी चालना मिळेल, असे त्यांनी सूचविले. या सोबतच गावात तलाठी पद रिक्त असल्याने त्यामुळेही नोंदणीवर परिणाम होत असल्याचे सांगून कायमस्वरुपी तलाठी द्यावा व तलाठी कार्यालयात मतदार नोंदणीचे अर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली.बीएलओंच्या कामाचा आढावा घ्यारिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी बीएलओ आपले काम सोडून घरी झोपलेले राहतात, असा आरोप करीत त्यांच्या कामाचा दररोज तहसील स्तरावरून आढावा घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकाºयांनीही तालुकास्तरावर जाऊन या कामाची पाहणी करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत बीएलओंच्या कामात सुधारणा न झाल्यास मतदार नोंदणीचा खर्च निरर्थक ठरेल, असे मत मांडले.नवमतदार नोंदणीत कामकुचारपणानवमतदार नोंदणीत बीएलओ कामकुकाचरपणा करीत असल्याने ते लोकांपर्यंतच पोहचलेच नसल्याचे सांगून अधिकाºयांनी यासाठी भेटी देण्याची मागणी समाजवादी पार्टीचे माजी महानगराध्यक्ष अशपाक पिंजारी यांनी केली.भाजपाबाबतचा संशय दूर कराचाळीसगाव तालुक्यात मतदार नोंदणीविषयी जनजागृती केली असून निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत पातळीवर मतदार यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवून भाजपा बाबत व्यक्त करण्यात येणारा संशय दूर करा, अशी मागणी भाजपाचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष दिनेश बोरसे यांनी केली.ईव्हीएमबाबत शंका दूर करामतदार नोेंदणीबाबत आपण रहिवाशांपर्यंत गेलो असता ते मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम) शंका व्यक्त करतात व एवढा खर्च करण्यापेक्षा मतदान यंत्रातील त्रुटी दूर करा, अशी मागणी करतात. त्यामुळे ईव्हीएमबाबतच्या शंका निवडणूक आयोगाने दूर करण्याची मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारुन नदवी यांनी केली.जनजागृतीवर भर द्यावारिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी मतदार नोंदणी जनजागृतीविषयी फलकावर सेलीब्रेटींऐवजी राष्ट्रीय पुरुषांचे छायाचित्र वापरावे असे सूचवित झोपडपट्टी भागात जनजागृती करण्याविषयी मागणी केली.या वेळी काँग्रेसचे अजबराव पाटील, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष रेयान जहागिरदार यांनीही काही सूचना सूचविल्या.सात बीएलओंवर गुन्हेबीएलओंच्या तक्रारी वाढत असल्याचे पाहून कामात कामकुचारपणा करणाºया सात बीएलओंवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.१०० टक्के छायाचित्र असलेला चोपडा मतदार संघ पहिलाचोपडा मतदारसंघात मतदार यादीमध्ये १०० टक्के मतदाराचे छायाचित्रांची नोंदणी झाली असून हा मतदारसंघ राज्यातील असा पहिला मतदारसंघ असल्याचेही बैठकीदरम्यान सांगण्यात आले.जळगाव जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण काम - राजाराम मानेमतदानास पात्र ठरणाºया प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत नोंदविणे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजावे व मतदान प्रक्रिया निर्दोष होण्यासाठी आपली माहिती अचूक नोंदवावी असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक राजाराम माने यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. मतदार नोंदणीच्या प्रक्रियेत जळगाव जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण काम सुरू असल्याचे माने यांनी नमूद केले.मतदारांनी अचूक माहिती नोंदविल्यास मतदानाची टक्क्केवारी वाढून लोकशाही मजबूत होण्यास मदत होईल. यादृष्टीने लोकहितासाठी सर्व राजकीय पक्षांनी पुढाकार घेवून तरुण मतदारांना मतदार नोंदणीमध्ये सहभागी करावे. त्याचबरोबर सर्व महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणीसाठी प्रचार व प्रसार व्हावा यासाठी यंत्रणांनी काम करावे, असे अवाहनही त्यांनी केले. लोकशाही प्रक्रियेत मतदारांनी योग्य गुणवत्तेचा लोकप्रतिनिधी निवडून देणे आपले कर्तव्य असल्याचे सांगून काही वर्षांपूर्वी मतदानाची टक्केवारी कमी असायची मात्र आता परिस्थिती बदलली असून मतदारांमध्ये जनजागृती व निवडणूक प्रक्रिया अचूक व जलद होत असल्यामुळे अनेक ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.दिव्यांग मतदार नोंदणीतही जळगाव जिल्हा राज्यात पहिला येणारदिव्यांग मतदार नोंदणीतही जळगाव जिल्हा राज्यात पहिला येईल असा आशावाद माने यांनी व्यक्त केला. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीनी केलेल्या सूचना निवडणूक आयोगाला कळविल्या जातील, असेही माने यांनी सांगितले.प्रास्ताविकात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम ३१ आॅक्टोंबर २०१८पर्यंत सुरु राहणार असून या कालावधीत मतदार यादी नावनोंदणी व दुरुस्ती याबाबत कार्यवाही करण्यात येईल. राजकीय पक्षांनी बीएलएची नियुक्ती करावी, असे आवाहन करीत मतदार नोंदणीचे कोरे अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती दिली. नवयुवक, दिव्यांग आणि महिला मतदारांच्या नोंदणीसाठी भर द्यावा, ज्या मतदारांचे मतदार यादीत छायाचित्रे नाहीत त्यांनी छायाचित्रे संकलनासाठी सहकार्य करावे. मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत दावे आणि हरकती स्वीकारण्याचा कालावधी ३१ आॅक्टोंबर २०१८ पर्यंत आहे. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी दावे व हरकती निकालात काढण्याचा कालावधी आहे. ३ जानेवारी २०१९ रोजी डाटाबेस अद्ययावतीकरण करण्यात येईल. ४ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे यांनी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची चित्रफितीद्वारे माहिती देताना जिल्ह्यातील मतदारांची संख्या, दिव्यांग मतदारांची संख्या, जनजागृतीबाब करण्यात येत असलेल्या उपाययोजना, सैनिक मतदार, अति महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती फोटोसह मतदारांची संख्या इत्यादीबाबतची माहिती देऊन आभार मानले.या बैठकीस उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, निवडणूक तहसीलदार थोरात यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, राजकिय पक्षांचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व निवडणूक यंत्रणेशी निगडीत सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी विवेकानंद विद्यालयाच्या मुकबधीर विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याबाबत आवाहनात्मक पथनाट्य सादर केले.
काम सोडून बीएलओ घरी झोपून राहतात, जळगावात मतदार नोंदणीवर उपस्थित केले प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:12 PM
मतदार यादी पुनरिक्षण बैठकीत राजकीय पक्षांकडून तक्रारींचा पाढा
ठळक मुद्देजनजागृतीचा अभावनवमतदार नोंदणीत कामकुचारपणा