जळगाव येथे बालिकेवर बलात्कार करणा-यास जन्मठेप, 17 महिन्यानंतर पीडितेला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:52 AM2018-01-13T11:52:34+5:302018-01-13T11:56:55+5:30

12 हजार रुपयांची रक्कम  पीडित मुलीस देण्याचे आदेश

Life sentence for raping a girl in Jalgaon | जळगाव येथे बालिकेवर बलात्कार करणा-यास जन्मठेप, 17 महिन्यानंतर पीडितेला न्याय

जळगाव येथे बालिकेवर बलात्कार करणा-यास जन्मठेप, 17 महिन्यानंतर पीडितेला न्याय

Next
ठळक मुद्दे12 जणांची घेतली साक्षआजन्म कारावासासह  15 हजार रुपयांचा दंड

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13-  मेहरुण परिसरातील भिलाटी भागात 16 जुलै 2016 रोजी रात्री एका वृध्देच्या घरात घुसुन तिच्या दहावर्षाच्या अल्पवयीन नातीवर अत्याचार करणा:या  राजू रमेश निकम (उर्फ कैलास आसरु बनकर) यास शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म कारावास तसेच पंधरा हजार दंड अशी शिक्षा सुनावली. यामुळे गेल्या 17 महिन्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या पीडितेला अखेर न्याय मिळाला. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता.   
12 जणांची घेतली साक्ष
या घटनेप्रकरणी न्यायालयाने 12 जणांच्या साक्षी घेण्यात आल्या. या घटनेचे मुख्य तपासाधिकारी सुनील कु-हाडे, पीडितेच्या वयाची व तीच्या आरोग्याची तपासणी करणारे डॉक्टर,  आरोपीची तपासणी करणारे डॉक्टर, स्वत: पीडिता यांच्यासह  पोलीस निरीक्षक सुजाता  राजपूत , महिला दक्षता समितीच्या शरीफा तडवी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. तर संपूर्ण खटल्यावेळी पीडित मुलीला मानसिक आधार पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव व मोनाली काळसकर यांनी दिला.
पीडित मुलीची आई ती 5 वर्षाची असताना वारली, आईच्या मृत्यूनंतर वडील देखील तीला वृध्द आजी व दोन लहान भावांसह सोडून घरातून निघुन गेले आहेत. त्यामुळे अंध-कर्णबधीर असलेल्या आजी व लहान भावांसाठी पिडीत मुलगी एकमेव आधार आहे. 
आजन्म कारावासासह  15 हजार रुपयांचा दंड
 राजु रमेश निकम (उर्फ कैलास आसरु बनकर) याला भादंवी कलम 376 (21)(1) या कलमाखाली  जन्मठेप तसेच 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद, तर भादंवी कलम 450 खाली 5 वषार्र्ची कैद व 5 हजार रुपये दंड. दंड न भरल्यास 6 महिन्यांची साधी कैद अशी  शिक्षा जिल्हासत्र न्यायाधीश ज्योती दरेकर यांनी सुनावली. 
 15 हजार रुपयांच्या दंडामधून 12 हजार रुपयांची रक्कम  पीडित मुलीस देण्याचे आदेश दिले. तसेच शासनाच्या मनोधैर्य योजनेतून पिडीत मुलीस मदत देण्यात यावी अशी सूचना देखील केली. सरकारी पक्षातर्फे अॅड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Life sentence for raping a girl in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.