दोन गावातील कर्जमुक्तीची यादी आज प्रसिद्धी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:58 PM2020-02-24T12:58:02+5:302020-02-24T12:58:44+5:30

जळगाव : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लवकरात लवकर लाभ देण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने त्यानुसार जिल्ह्यातील दोन ...

 The list of debt relief in two villages will be publicized today | दोन गावातील कर्जमुक्तीची यादी आज प्रसिद्धी होणार

दोन गावातील कर्जमुक्तीची यादी आज प्रसिद्धी होणार

Next

जळगाव : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लवकरात लवकर लाभ देण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने त्यानुसार जिल्ह्यातील दोन गावांमधील पात्र शेतकऱ्यांची यादी सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी प्रायोगिक तत्वावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यात पारोळा तालुक्यातील कराडी व यावल तालुक्यातील हिंगोणा गावाचा समावेश आहे.
२५०० खात्यांचीच अडचण
आतापर्यंत कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांची माहिती अपलोड करण्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र जिल्हा बँकेचे खातेदार असलेल्या सुमारे १५०० व राष्टÑीयकृत बँकांचे खातेदार असलेल्या १००० अशा २५०० शेतकºयांचीच माहिती अपलोड होण्यात अडचणी येत आहेत. त्याबाबतही शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत अल्प मुदतीचे पीककर्ज घेतलेल्या तसेच अल्प मुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन, फेर पुनर्गठन केलेल्या कर्जातील ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत २ लाखांपर्यंत रक्कम थकीत असलेल्या शेतकºयांना या महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा बँकेचे सभासद असलेले १ लाख ५१ हजार २०५ शेतकरी तर राष्टÑीयकृत बँकांचे २९ हजार ४२९ असे १ लाख ८० हजार ६३४ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र आहेत. त्यापैकी ९९ टक्के शेतकºयांची माहिती शासनाच्या वेबपोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

दोन गावांमधील २४५ शेतकरी
पारोळा तालुक्यातील कराडी येथील १०१ व यावल तालुक्यातील हिंगोणे येथील १४४ अशा २४५ शेतकºयांची यादी प्रातिनिधीकस्तरावर सोमवारी प्रसिद्ध होत आहे. त्या यादीत दिलेल्या कर्जरक्कमेवर संबंधीत शेतकºयास आक्षेप नसल्यास पुढील आठवड्यापर्यंत संबंधीत रक्कम त्या शेतकºयाच्या खात्यात जमा होऊन हे शेतकरी कर्जमुक्त होतील. जर काही आक्षेप असल्यास तो विषय जिल्हास्तरीय समितीकडे जाईल. तरीही एप्रिलअखेरपर्यंत सर्व शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ दिला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घाईगर्दी
सोमवार, २४ फेब्रुवारीपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर कर्जमुक्तीचा लाभ देण्याची घाईगर्दी सुरू आहे. शेतकºयांना तातडीने कर्जमुक्ती देण्यासाठी सुटीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश शासनाने सहकार विभागाला दिले होते. त्यानुसार सुटीच्या दिवशीही काम करून ही माहिती अपलोड करण्यात आली आहे. आता सोमवारी दोन गावांची यादी प्रातिनिधिक स्वरूपात विविध कार्यकारी सोसायटीच्या स्तरावर प्रसिद्ध केली जाईल.

Web Title:  The list of debt relief in two villages will be publicized today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.