लॉकडाऊनमुळे बांधकाम व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 05:03 PM2020-03-30T17:03:37+5:302020-03-30T17:05:47+5:30

बांधकाम व्यवसायाशी निगडीत मजुर वगार्ला लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला आहे.

 Lockdown threatens construction business | लॉकडाऊनमुळे बांधकाम व्यवसाय धोक्यात

लॉकडाऊनमुळे बांधकाम व्यवसाय धोक्यात

Next
ठळक मुद्देरोजगाराअभावी बांधकाम मजुरांचे हालतालुक्यातील ५५ टक्के अर्थकारण बांधकाम व्यवसायावर अवलंबून

जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव : 'कोरोना'च्या साखळ्या घट्ट झाल्यानंतर 'लॉक डाऊन'ही अनेक व्यवसाय व उद्योगांच्या मुळावर उठले आहे. याचा सर्वाधिक मोठा फटका बांधकाम व्यवसायाला बसला आहे. सद्य:स्थितीत बांधकामाच्या सर्व साईटस बंद असून सुरक्षारक्षकांअभावी ओस पडल्या आहे. बांधकाम व्यवसायाशी निगडीत मजुर वगार्ला लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील ५५ टक्के अर्थकारण बांधकाम व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र गेल्या आठवड्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर बांधकामे थांबली आहेत. मध्यंतरी वाळूची उपलब्ध होत नसल्यानेही बांधकामांचा वेग मंदावला होता. लॉकडाऊनमुळे त्याचा आता 'चक्काजाम' झाला आहे.
मध्य प्रदेशातील तीन हजार मजूर
बांधकामाशी निगडीत जास्त श्रमाची कामे करण्यासाठी चाळीसगाव शहर परिसरात मध्य प्रदेशातून आलेले पावरा समजाचे तीन हजार मजूर वास्तव्यास होते. मात्र लॉकडाऊनमुळे हे सर्व मजूर आपापल्या गावी परतले आहे. सुरक्षारक्षकांची कामेदेखील हेच मजूर करायचे.
२५ हजार मजुरांच्या रोजीरोटीचेच 'लॉकडाऊन'
बांधकाम व्यवसायासह अन्य त्याच्याशी निगडीत छोटे - मोठे व्यवसाय व उद्योग यात काम करणाऱ्या २५ हजार मजुरांच्या रोजीरोटीचे लॉकडाऊन झाले आहे. त्यांची कुटुुंूंबे उपासमारीने हतबल झाली आहेत.
बांधकाममासाठी लागणारे मटेरियल वाहतूक, प्लंबिंग, रंगकाम, इलेक्ट्रीक फिटींग, फर्निचर, सेंट्रींग काम करणारे कारागीर, खड्डे खोदकाम करणारे श्रमिक असा मोठा लवाजमाही बांधकाम व्यवसायावर आपले पोट भरतो. कामेच ठप्प झाल्याने मजुरांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
व्यावसायिकांचे भांडवलही मोठ्या प्रमाणात अडकले आहे. तयार घरांची विक्रीदेखील मंदावली आहे. खरेदी-विक्रीचे व्यवहार अत्यल्प होत आहे. तयार घरांच्या अनेक साईटस ग्राहकांच्या प्रतीक्षेत असून दरवर्षी बांधकाम व्यावसायिक गुढीपाडव्याला नव्या साईटसचा शुभारंभ करतात. यंदाचे वर्ष याला अपवाद ठरले आहे.

Web Title:  Lockdown threatens construction business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.