दौंड-मनमाड दरम्यान मालगाडीचे १२ डबे घसरल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे रद्द व मार्ग परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:20 PM2020-12-23T16:20:46+5:302020-12-23T16:22:07+5:30
अहमदनगरजवळ मालगाडीचे १२ डबे घसरल्यामुळे लांब गाड्या वळविण्यात वा रद्द केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-मनमाड दरम्यान श्रीगोंदा ते बेलवंडी स्थानकांदरम्यान अहमदनगरजवळ मालगाडीचे १२ डबे घसरल्यामुळे पुढील लांब गाड्या वळविण्यात वा रद्द केल्या आहेत.
गाड्या रद्द केल्या
०२११७पुणे-अमरावती स्पेशलप, ०१०३९ कोल्हापूर-गोंदिया स्पेशल, ०२०१६ पुणे-मुंबई स्पेशल या गाड्या २३ डिसेंबर रोजी प्रारंभिक स्थानकावरून रद्द करण्यात आल्या आहेत. ०१०४० गोंदिया-कोल्हापूर स्पेशल २५ डिसेंबरला रद्द करण्यात आली आहे.
पुणे-लोणावळा-पनवेल-इगतपुरी-मनमाड मार्गे वळविण्यात आलेल्या गाड्या
०२७७९ वास्को-हजरत निजामुद्दीन स्पेशल, ०१०३९ कोल्हापूर-गोंदिया स्पेशल , ००१०३ सांगोला-नरखेर किसान स्पेशल, ०६२२९ म्हैसूर-वाराणसी स्पेशल, ०६५२७ बेंगलुरू-हजरत निजामुद्दीन स्पेशल, या गाड्यांचे मार्गात परिवर्तन करण्यात आले. ०२१४९पुणे-दानापूर स्पेशल या गाड्यांच्या मार्गात परिवर्तन करण्यात आले.
मनमाड-इगतपुरी-पनवेल-लोणावळा-पुणेमार्गे वळविण्यात आलेल्या गाड्या
०१०४०गोंदिया-कोल्हापूर स्पेशल प्रस्थान, ०६५२४हजरत निजामुद्दीन-येसवंतपूर स्पेशल, ०२१५०,दानापूर-पुणे स्पेशल प्रस्थान, ०६५०१ अहमदाबाद-यशवंतपूर स्पेशल प्रस्थान ०१०७८, जम्मू तवी-पुणे स्पेशल , ०२७८० हजरत निजामुद्दीन- वास्को स्पेशल, ०२२२४ अजनी-पुणे स्पेशल प्रस्थान, ०१०४० गोंदिया-कोल्हापूर स्पेशल, ०२१५० दानापूर-पुणे स्पेशल या गाड्या मनमाड, इगतपुरी, पनवेल, लोणावळा, पुणेमार्गे वळविण्यात आल्या आहेत.
०२१३६ मंडूआडीह-पुणे स्पेशल जळगाव-सूरत-वसई रोड-पनवेल-लोणावळा मार्गे गाड्या वळविण्यात आल्या. ०१०३३ पुणे-दरभंगा स्पेशल दौंड-कुर्डूवाडी-लातूर रोड-पिंपळखुटी-नागपूरमार्गे वळविण्यात आली. ०१०७७ पुणे जम्मू तावी ही गाडी पुणे-कर्जत-पनवेल-वसई रोड-रतलाम-कोटा-मथुरा जंक्शनमार्गे गाडी वळविण्यात आली. ०६५२८ हजरत निजामुद्दीन बेंगलोर विशेष गाडी खंडवा-अंकई-पूर्णा-परभणी लातूर रोड-कुर्डूवाडी-वाडीमार्गे वळविण्यात आली आहे.