२०२० वर्षात शहरातील प्रदूषणाचा नीचांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:09 AM2020-12-28T04:09:18+5:302020-12-28T04:09:18+5:30

लॉकडाऊनचा फायदा : वाईटातूनही चांगले, प्रदूषणाच्या स्तरात १०० टक्क्यांची घट लोकमत न्यूज नेटवर्क धुलीकणांची वर्षनिहाय स्थिती - (सरासरी, ...

Low pollution level in the year 2020 | २०२० वर्षात शहरातील प्रदूषणाचा नीचांक

२०२० वर्षात शहरातील प्रदूषणाचा नीचांक

Next

लॉकडाऊनचा फायदा : वाईटातूनही चांगले, प्रदूषणाच्या स्तरात १०० टक्क्यांची घट

लोकमत न्यूज नेटवर्क

धुलीकणांची वर्षनिहाय स्थिती - (सरासरी, टक्क्यात)

२०१० - ४० ते ४५

२०११ - ४५ ते ५०

२०१२ - ४७ ते ५२

२०१३ - ४७ ते ५२

२०१४ - ४७ ते ५५

२०१५ - ५० ते ५५

२०१६ - ५५ ते ६०

२०१७ - ५५ ते ६५

२०१८ - ६० ते ६५

२०१९ - ७० ते ७५

२०२० - ४५ ते ५०

विविध वायूंचे प्रमाण (पॉइंट मध्ये)

कार्बन मोनोक्साईड

२०१० - २०० ते २२५

२०११ - २१० ते २२५

२०१२ - २१५ ते २३०

२०१३ - २२० ते २३०

२०१४ - २३० ते २३५

२०१५ - २४० ते २५५

२०१६ - २४५ ते २६५

२०१७ - २६५ ते २७५

२०१८ - २७५ ते ३००

२०१९ - ३०० ते ३२५

२०२० - २०० ते २३०

सल्फरडाय ऑक्साईड

२०१० - २.९० पॉइंट

२०१५ - ३.३० पॉइंट

२०२० - २.७० पॉइंट

--

एकूण प्रदूषणाचा स्तर

२०१० - १५० ते २२०

२०१३ - १६० ते २३०

२०१५ - १७० ते २५०

२०१९ - २३० ते २७०

२०२० - १५० ते २००

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - २०२० हे वर्ष कोणीही आपल्या आठवणीत ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही. कोरोनाच्या कटू आठवणीमुळे सर्वांनाच वेदना देणारे

ठरले आहे. मात्र, २०२० हे वर्ष जळगाव शहरासह जिल्ह्यातील पर्यावरणाच्या दृष्टीने फायद्याचे ठरले आहे. कारण गेल्या दहा वर्षांतील

नीचांक प्रदूषणाची नोंद या वर्षी झाली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असली तरी पर्यावरणाच्या दृष्टीने हे

वर्ष फायद्याचे ठरले आहे. धुलीकण, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनोक्साईडसह सर्वच प्रकारच्या प्रदूषणात २०२० मध्ये घट झाली आहे.

त्याला एकमेव कारण तीन महिन्यांचे कडक लॉकडाऊन असले तरी मात्र, लॉकडाऊन उघडल्यानंतर प्रदूषणाचा स्तर हा पुन्हा वाढायला

सुरुवात झाली आहे.

गेल्या वर्षभरात संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातल्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पुकारण्यात आलेल्या

लॉकडाऊनचा परिणाम प्रत्येक नागरिकावर झालेला आहे. मात्र, लॉकडाऊनमधून काही चांगल्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्यात

प्रामुख्याने पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास काही काळ का असेना थांबला आहे. गेल्या दहा वर्षांच्या प्रदूषणाचा एकूण स्तराच्या

सरासरीच्या विचार केल्यास २०२० या वर्षात जळगाव शहराचा प्रदूषणाचा स्तर दहा वर्षांपूर्वी जितका होता तितकाच झाला आहे. २०१९ च्या

तुलनेत तब्बल १०० टक्क्यांची घट या वर्षात झाली आहे.

मार्च, एप्रिल महिन्यात सरासरी घटली

मार्च व एप्रिल महिन्यात सर्वात कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. या महिन्यात शहरातील ७० टक्के उद्योग व कारखाने बंद होते. यासह

८० टक्के वाहने देखील बंदच होते. यामुळे कारखाने व वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसला. एप्रिल महिन्यात जळगाव शहरातील

प्रदूषणाचा स्तर ५० पर्यंत खाली आला होता. तर धुलीकणांचे प्रमाण देखील २५ ते ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. मात्र, जून महिन्यानंतर

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर प्रदूषण व धुलीकणांचे प्रमाण देखील वाढत जात आहे. धुलीकणांचे प्रमाण शहरातील खराब

रस्त्यांमुळे वाढत आहे.

कोट..

प्रदूषणाचा झालेल्या स्तरासाठी लॉकडाऊन हे प्रमुख कारण आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनासोबतच प्रदूषणालाही रोखण्याचे काम यामुळे

झाले आहे. भविष्यातही अशाच प्रकारे जर महिन्यातील एक दिवस वाहने न वापरणे, सर्व कारखाने एक दिवस बंद ठेवणे असे उपक्रम

राबविले. तरीही पर्यावरणाचा बचाव होऊ शकतो आणि हे लॉकडाऊनने सिध्द करून दाखवले आहे.

-नीलेश गोरे, संचालक, वेलनेस वेदर

लॉकडाऊनने आपल्याला पर्यावरण संवर्धनाचा एक मार्ग दाखविला आहे. भविष्यात आठवडा किंवा महिन्यातील एक दिवस जनता कर्फ्यू किंवा एक दिवस पूर्णपणे लॉकडाऊन पाळल्यास प्रदूषणाच्या वाढत जाणाऱ्या प्रमाणावर काही प्रमाणात का असेना बंधन घालू शकतो. जे आपण लॉकडाऊनमध्ये कमावले आहे. तेच कायम ठेवण्याची संधी आपल्याला आहे.

-प्रणील चौधरी, संचालक, योगी संस्था

Web Title: Low pollution level in the year 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.