जळगाव : महाराष्ट्रात राहणाऱ्या दधिच (दायमा) परिवारांच्या जनगणनेला सुरूवात करण्यात आली आहे. अशी जनगणना सर्वप्रथम २००४ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आता १७ वर्षांनी जनगणना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यात जवळपास २५०० कुटुंबांची जनगणना होणार आहे.
२००४ मध्ये श्रीकांत खटोड आणि दधिच नवयुवक मंडळ, जळगावने हे काम पुर्ण केले होते. आता पुन्हा १७ वर्षानंतर आज कोणत्या परिवारात किती सदस्य वाढले आणि किती कमी झाले. याची माहिती घेऊन एक पुस्तिका तयार केली जाणार आहे. ही माहिती दधिच कम्युनिटी इंटरनॅशनल ॲपमध्ये भरली जाईल. हे काम अध्यक्ष सत्यनारायण खटोड यांच्या नेतृत्वात केले जाणार आहे. त्यासाठी कार्याध्यक्ष उत्तमचंद डुमनिया, महामंत्री विनोद त्रिपाठी, कोषाध्यक्ष राधेश्याम दायमा, उपाध्यक्ष प्रशांत कुदाल, गोपाल बोरायडा, अरुण दधीच, भाग्येश त्रिपाठी, सौरभ शर्मा यांनी यात सहकार्य केले आहे.