मनीष जैन यांनी घेतला गिरीश महाजन यांना चिमटा- जामनेरला स्नेहभोजन कार्यक्रमात रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:22 PM2021-01-10T16:22:09+5:302021-01-10T16:22:43+5:30

जामनेर : माजीमंत्री गिरीश महाजन हे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतात. याचा अर्थ जैन ...

Manish Jain Tweaks Girish Mahajan - Paints Jamner | मनीष जैन यांनी घेतला गिरीश महाजन यांना चिमटा- जामनेरला स्नेहभोजन कार्यक्रमात रंगत

मनीष जैन यांनी घेतला गिरीश महाजन यांना चिमटा- जामनेरला स्नेहभोजन कार्यक्रमात रंगत

googlenewsNext



जामनेर : माजीमंत्री गिरीश महाजन हे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतात. याचा अर्थ जैन त्यांचे झाले, असा कोणी काढू नये. ते आपलेच आहेत, अशी कोपरखळी माजी आमदार मनीष जैन यांनी रविवारी येथील स्नेहभोजन कार्यक्रमात केली. यामुळे त्यातून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
माजी खासदार जैन यांना तालुक्यात बाबूजी संबोधले जाते. ते राष्ट्रवादीचे नेते असले तरी गेल्या काही वर्षांपासून त्यांची महाजन यांच्याशी असलेली जवळीक नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. हाच धागा पकडून मनीष जैन यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा चर्चेला ऊत आला आहे.
मनीष जैन हे गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यातील शेतीकडे लक्ष देत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीतून उत्पादन वाढीकडे त्यांचा कल आहे. त्यांनी लागवड केलेल्या शेतातील वांग्याच्या भरीताचे स्नेहभोजन आज मनाली फार्मममध्ये होते.
या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे अध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, गफ्फार मलिक, अभिषेक पाटील, जळगावचे माजी नगरसेवक बंडू काळे, अतुल हाडा, मनपाच्या सभापती सुचिता हाडा, माजी आमदार दत्तात्रय महाजन, माजी नगराध्यक्ष राजू बोहरा, पारस ललवाणी, संजय गरुड, दिगंबर पाटील, भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, अनिल बोहरा, श्रीराम महाजन उपस्थित होते.
ईश्वरलाल जैन यांनी मनीष यांच्या शेती समृद्धी प्रकल्पास शुभेच्छा दिल्या व तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: Manish Jain Tweaks Girish Mahajan - Paints Jamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.