विवाहित मुलीचा पुन्हा साखरपुडा, जळगावातील तरुणाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:34 PM2018-01-25T12:34:33+5:302018-01-25T12:39:31+5:30
दोघांना पोलीस कोठडी
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 25- अल्पवयीन मुलगी विवाहित असताना ती अविवाहित असल्याचे भासवून तिचा तरुणाशी साखरपुडा घडवून आणला, याशिवाय तरुणाची 76 हजार रुपयात फसवणूक केल्याच्या प्रकरणात या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे तर सूरज कृष्णा पाठक (वय 20 रा. श्रीरामपूर जि. अहमदनगर) व राजेंद्र उर्फ लक्ष्मण खरात (वय 40 रा. नांदूर खुर्द, ता.राहता, जि.अहमदनगर) या दोघांना बुधवारी अटक करण्यात आली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमोल सदाशिव जोशी (वय 28 रा.साई प्रसाद कॉलनी, मेहरुण जळगाव) या तरुणाचे श्रीरामपूर येथील एका तरुणीशी लगA निश्चित झाले होते.
प्रीती उर्फ कोमल गिरीश जैन, सूरज कृष्णा पाठक, राजू खरात, सिंधूबाई (पूर्ण नाव नाही), साईनाथ पुंडलिक पाटील, दिव्या साईनाथ पाटील यांनी संगनमत करुन अमोल या तरुणाची फसवणूक केली होती. दरम्यान, यातील राजेंद्र खरात हा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा आरोपी आहे.
अटकेतील सूरज पाठक व राजेंद्र खरात या दोघांना न्या.बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता 27 र्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर अल्पवयीन मुलीची निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती उएन.बी.सूर्यवंशी यांनी दिली.
या मुलीचे आधी लगA झालेले असताना ती अविवाहित असल्याचे सांगून तिच्याशी अमोलचे लगA निश्चित करुन साखरपुडाही उरकण्यात आला. त्यासाठी 50 हजार रुपये रोख व दागिने अशी 76 हजार रुपयात फसवणूक केली. हा प्रकार उघड झाल्यानंतर अमोल याच्या फिर्यादीवरुन 7 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी व रतिलाल पवार यांनी बुधवारी दोघांना अटक केली.