पीक विम्यापासून वंचितांचे गाºहाणे ‘मातोश्री’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 07:48 PM2019-07-03T19:48:08+5:302019-07-03T19:49:03+5:30

पीक विम्याच्या रकमेपासून वंचित असलेल्या चाळीसगाव तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांनी आपले गाºहाणे मुंबईत मातोश्रीवर शिवसेना भवनात मांडले.

Matoshree, from the crop insurance, | पीक विम्यापासून वंचितांचे गाºहाणे ‘मातोश्री’कडे

पीक विम्यापासून वंचितांचे गाºहाणे ‘मातोश्री’कडे

Next
ठळक मुद्देचाळीसगाव तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांचे म्हणणे मांडले शिवसेना भवनावरपुढील आंदोलनाची दिशा ठरविणार

चाळीसगाव, जि.जळगाव : पीक विम्याच्या रकमेपासून वंचित असलेल्या चाळीसगाव तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांनी आपले गाºहाणे मुंबईत मातोश्रीवर शिवसेना भवनात मांडले.
शिवसेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभरातील पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकºयांना पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी त्यांचे तक्रार असलेले फॉर्म भरून घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, या मोहिमेंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील ज्या शेतकºयांनी पिकाचा विमा काढला आहे आणि हप्ताही भरला आहे, मात्र गेल्या वर्षभर दुष्काळ असूनही शेतकºयांच्या संपूर्ण पिकाचे नुकसान झाले असताना विमा कंपन्यांनी या शेतकºयांना कुठलेही नुकसान भरपाई दिले नाही, अशा शेतकºयांचे सविस्तर माहिती व तक्रार असलेले फार्म भरून घेऊन चाळीसगाव शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्यामार्फत शिवसेना भवन, मुंबई येथे रवाना करण्यात आले आहेत. यात तालुक्यातील ७०० पेक्षा अधिक शेतकºयांनी स्वयंस्फूर्तीने आपले फॉर्म भरून चाळीसगाव शिवसेना तालुका कार्यालयाकडे जमा केले आहेत.
यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण यांनी संपूर्ण ग्रामीण भागातील पदाधिकाºयांना मार्फत शेतकºयांना आवाहन करून शेतकºयांचे फॉर्म भरून घेतले आहे. यामुळे तालुक्यातील विमाधारक शेतकºयांना लवकरच विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम न दिल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. शिवसेनेचे तालुका संपर्कप्रमुख प्रकाश वाणी यांनी यासाठी चाळीसगावात चार दिवस थांबून मार्गदर्शन केले. तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख उमेश गुंजाळ जिल्हा उप समन्वयक महेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमराव खलाणे, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, संघटक सुनील गायकवाड, विभागप्रमुख दिनेश विसपुते, तालुका उपप्रमुख हिंमत निकम, तालुका उपप्रमुख दिलीप पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप पाटील, पांडुरंग बोराडे, अण्णा पाटील, प्रभाकर उगले, रोहित जाधव, नाना शिंदे, बापू लोणेकर, भोरसचे शाखाप्रमुख अनिल पाटील, सचिन ठाकरे, संदीप पाटील, एरंडे माणिक, गुंजाळ, बापू भोई, ऋषिकेश देवरे, नंदू गायकवाड आदींनी यासाठी परिश्रम घेतले.

Web Title: Matoshree, from the crop insurance,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.