जळगाव : महावितरणतर्फे पुढील वर्षी १ एप्रिलपासून औद्योगिक वीज ग्राहकासांठी केव्हीएएच बिलिंगची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. या प्रणालीबाबत उद्योजकांच्या शंका-समाधानासाठी गुुरुवारी एमआयडीसीतील महावितरणच्या कार्यालयात उद्योजकांचा मेळावा झाला.या मेळाव्यात जळगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजक व उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता प्रदीप सोरटे, सहाय्यक अभियंता राजेंद्र राठोड यांनी बिलिंग प्रणाली बाबत माहिती दिली.या प्रणालीमुळे ग्राहकांना उर्जेची हानी कमी करता येणार असून, यामुळे वीजबिलातही बचत होणार असल्याचे सांगितले. यानंतर उद्योजकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी आपले प्रश्न उपस्थित करुन, शंकाचे निरसन करुन घेतले.या मेळाव्याला महावितरणचे अधीक्षक अभियंता फारूख शेख, कार्यकारी अभियंता संजय तडवी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता धीरज बारापात्रे, उपकार्यकारी अभियंता रविंद्र पवार, राजेश पाटील, सहाय्यक अभियंता देवेंद्र सिडाम, विशाल आंधळे उपस्थित होते.काय आहे केव्हीएएच बिलिंग प्रणालीकेव्हीएच बिलींग प्रणालीत ग्राहकांना त्यांच्या पॉवर फॅक्टरनुसार उत्तेजन देण्यासाठी किंवा दंड आकारण्याची यंत्रणा आहे. केव्हीएएच बिलींगचा मुख्य उद्देश ग्राहकांना पॉवर फॅक्टर योग्य राखण्यासाठी प्रोत्साहित करून उर्जेची हानी कमी करणे, विद्युत यंत्रणेच्या स्थिरतेत वाढ, दर्जेदार व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळविणे आहे. राष्ट्रीय स्तरावर ऊर्जा वापर अनुकूल करण्यासाठी ऊर्जा संवर्धन, ऊर्जा कार्यक्षमता आणि मागणीचे व्यवस्थापनावर जोर देण्यात आला आहे. केव्हीएएच बिलिंगव्दारे ग्राहक कार्यक्षम ऊर्जा वापरासाठी प्रोत्साहित झाल्याने कमी वीजबिल येऊन ग्राहकांचा फायदा असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
केव्हीएएच बिलींग बाबत उद्योजकांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 10:04 PM