स्वच्छतेच्या मुद्यावरुन गाजली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 09:33 PM2019-12-13T21:33:59+5:302019-12-13T21:34:09+5:30

सावदा नगरपालिका : १५ पैकी १३ विषय झाले सर्वानुमते मंजूर

Meetings held on the issue of cleanliness | स्वच्छतेच्या मुद्यावरुन गाजली सभा

स्वच्छतेच्या मुद्यावरुन गाजली सभा

Next

सावदा : नगरपालिका सभागृहात शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकूण पंधरा विषयांपैकी तेरा विषयावर कामकाज झाले. स्वच्छतेचा मुद्दा यावेळी चांगलाच गाजला.
यावेळी दोन विषयावर स्थगिती दिली. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहरासाठी थ्री स्टार रेटिंग मानांकन करणेबाबत तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत शहरास हागणदारीमुक्त ओडीएफ हा दर्जा घोषित करणेबाबत विचार विनिमय करणे अशा दोन विषयांना स्थगिती देण्यात. तेरा विषय सवार्नुमते मंजूर करण्यात आले. शहरातील मंदिरांना पेव्हरब्लॉक लावण्यासाठी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी एक वषार्पूर्वी अर्ज दिला होता मात्र हा विषय अजेंड्यावर घेतला गेला नाही. नगरसेवक किशोर बेंडाळे यांनी रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात मढी मागच्या जागेत भराव करून भाजीविक्रेत्यांची व्यवस्था करावी म्हणजे रहदारीस अडथळा होणार नाही, असे म्हटले. माजी नगराध्यक्ष नंदाबाई लोखंडे यांनी घरचाच आहेर देताना सांगितले की गावातच स्वच्छता नाही तोच विषय नगरसेवक राजेश वानखेडे, नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनीही गाजवला. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी तात्काळ सफाई कामगारांना कामाचा रिपोर्ट द्यायला सांगितले तर कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करु, असे बजावले. नगरसेविका नंदाबाई लोखंडे यांनी म्हटले की, ९० लाख रुपये शौचालय दुरुस्तीसाठी खर्च केले तरी योग्य दुरुस्ती झाली नाही. अतिक्रमणाची कारवाई करताना एकाला अंगाशी तर दुसºयाला पायाशी ठेवतात असे करू नका, असे नगरसेवक राजेश वानखेडे यांनी सांगितले.

Web Title: Meetings held on the issue of cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.