स्वातंत्र्यानंतर मंत्री पहिल्यांदाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:21 AM2021-08-14T04:21:48+5:302021-08-14T04:21:48+5:30

प्रमोद पाटील कासोदा, ता. एरंडोल : येथून जवळच असलेल्या व एक प्रभाग देखील नसलेल्या अगदीच लहान बांभोरी या गावात ...

Minister for the first time since independence | स्वातंत्र्यानंतर मंत्री पहिल्यांदाच

स्वातंत्र्यानंतर मंत्री पहिल्यांदाच

Next

प्रमोद पाटील

कासोदा, ता. एरंडोल : येथून जवळच असलेल्या व एक प्रभाग देखील नसलेल्या अगदीच लहान बांभोरी या गावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी रोजी भेट दिली. स्वातंत्र्यानंतर मंत्री आलेले गावाने पहिल्यांदाच पाहिले.

मंत्र्यांनी गावात जाणाऱ्या नाल्यांच्या पुलासाठी २५ लाख रुपये एवढा मोठा निधी देखील दिला आहे, हे विशेष. या गावात देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झालीत, पण कोणताही मंत्री या गावाने पाहिलेला नव्हता, गुलाबराव पाटील हे पहिलेच मंत्री आहेत की, त्यांनी या गावाला भेट तर दिलीच पण या गावाची रस्त्याची अडचण कायमची दूर केली आहे.

फक्त १८० मतदार असलेले व राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित गांव. मतदार संख्या अत्यल्प असल्याने या गावांसाठी विकास कामांसाठी मोठा निधी आजतागायत मिळालेला नाही, या गावात जाण्यासाठी रस्ता देखील जेमतेम. एरंडोल ते कासोदा या राज्यमार्गावर येण्यासाठी एक नाला आडवा येतो,या नाल्याला पूर आला की गावाचा संपर्क तुटतो, शेतकऱ्यांना नाल्यातून बैलगाडी नेतांना मोठे हाल होतात,या सर्व समस्या जाणून घेऊन मतदार संघ नसताना व अत्यंत लहान खेडे असतानादेखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाल्यावरील पूल व एक कि.मी.डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला.

मंत्री येणार असल्याने मोलमजुरी करणारे ह्या गावातील बायाबापड्या व मजूर आज दिवसभर घरीच होते. मंत्र्यांसोबत जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल माने, तालुकाध्यक्ष वासुदेव पाटील, जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, जगदीश पाटील, रवींद्र चौधरी, उमेश पाटील, राजेंद्र वाणी, स्वप्नील बियाणी,सह अनेक मान्यवर उपस्थित होते,

गावातील पोलीस पाटीलांसह नागरिक व भगिनींनी मंत्र्यांचे स्वागत केले, प्रास्ताविक प्रमोद पाटील यांनी केले तर आभार उमेश पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवींद्र चौधरी, राजेंद्र वाणी, भगवान खैरनार, नारायण पाटील,गोपीचंद पाटील यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Minister for the first time since independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.