जामनेरातून पलायन केलेला अल्पवयीन मुलगा, मुलगी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 09:38 PM2019-07-30T21:38:37+5:302019-07-30T22:05:25+5:30
दवाखान्याचे नाव करुन घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी व एक मुलगा दोघं जण जामनेर येथून रफूचक्कर झाले होते. या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी भुसावळ येथून ताब्यात घेतले. ही मुलगी व मुलगा २६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरातून गायब झाले होते. संबंधित मुलाने फूस लावून पळविल्याची तक्रार जामनेर पोलिसात दिल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.
जळगाव : दवाखान्याचे नाव करुन घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी व एक मुलगा दोघं जण जामनेर येथून रफूचक्कर झाले होते. या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी भुसावळ येथून ताब्यात घेतले. ही मुलगी व मुलगा २६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरातून गायब झाले होते. संबंधित मुलाने फूस लावून पळविल्याची तक्रार जामनेर पोलिसात दिल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले,अपर पोलीस अधीक्षकभाग्यश्री नवटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम व पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना तपासाच्या सूचना केल्या होत्या.
त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे , शिवाजी पाटील, विलास चव्हाण, इस्माईल शेख, किशोर परदेशी, मुकेश आमोदकर, दीपक जाधव, तुषार पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील हेडकॉन्स्टेबल विजय पाटिल, नरेंद्र वारुळे यांना सुरत, भुसावळ व जळगाव येथे रवाना केले होते. या पथकाने जामनेर व जळगाव शहरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोघं जण भुसावळकडे रवाना झाल्याचे दिसून आले. या पथकाने मंगळवारी दोघांना भुसावळ शहरातून ताब्यात घेतले. नंतर जामनेर पोलिसात यावेळी दोघांच्या पालकांचे जबाब घेवून मुले त्यांच्या ताब्यात देण्यात आली.