मू.जे. महाविद्यालयात अमृत महोत्सव प्रकट कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 08:26 PM2019-09-13T20:26:12+5:302019-09-13T20:27:23+5:30

जळगाव - खान्देश कॉलेज एज्युकेशन सोयासटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी सायंकाळी ५ वाजता मू़जे़ महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ...

 MJ Amrit Mahotsav manifest program in college | मू.जे. महाविद्यालयात अमृत महोत्सव प्रकट कार्यक्रम

मू.जे. महाविद्यालयात अमृत महोत्सव प्रकट कार्यक्रम

googlenewsNext

जळगाव- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोयासटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी सायंकाळी ५ वाजता मू़जे़ महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अमृत महोत्सव प्रकट कार्यक्रम रंगणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली़ मू़जे़ महाविद्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉ़ उदर्य कुलर्णी, डॉ़ ए़आऱराणे, डॉ़ युवाकुमार रेड्डी, प्रा़ दिलीप हुंडीवाले आदींची उपस्थिती होती़
दरम्यान, रविवारी कार्यक्रमाप्रसंगी अमृत महोत्सव लोगो तसेच प्रतिक चिन्हाचे अनावरण आणि केसीई ज्ञानजगत अंकाचे प्रकाशन केले जाणार आहे़ त्यासोबतच केसीईतील जेष्ठ सदस्य, सेवानिवृत्त ज्येष्ठ प्राचार्य व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती शशिकांत वडोदकर यांनी दिली़

हे असणार प्रमुख मान्यवर
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिल्ली येथील एनआयसीटीई येथील चेअरमन डॉ़ अनिल सहस्त्रबुध्दे, विद्यापीठ अनुदान आयोगचे उपाध्यक्ष डॉ़ भूषण पटवर्धन, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ सुहास पेडणेकर, पुणे येथील सावित्रीबाई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ नितीन करमळकर, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे डॉ़ रामा शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमात असणार आहे़ तसेच अमृत महोत्सवानिमित्त वर्षभरात ७५ विविध कार्यक्रम २२ संस्थांमध्ये पार पडणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ़ उदय कुळकर्णी यांनी दिली़ यावेळी पत्रकार परिषदेला प्रा़ स़ना़भारंबे, डॉ़ गौरी राणे, डॉ़ देवयानी बेंडाळे, डॉ़ करूणा सपकाळे, डॉ़ प्रज्ञा जंगले, सुभाष तळेले, संदीप केदार, गणेश सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती़

 

Web Title:  MJ Amrit Mahotsav manifest program in college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.