मक्तेदारांनी कामाचा दर्जा योग्य ठेवा, कुणाचीही तक्रार येऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:15 AM2021-04-11T04:15:17+5:302021-04-11T04:15:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात मनपा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा आणि गुणवत्ता नेहमी योग्य राखला जाईल याकडे ...

Monopolists should keep the quality of work right, no one should complain | मक्तेदारांनी कामाचा दर्जा योग्य ठेवा, कुणाचीही तक्रार येऊ नये

मक्तेदारांनी कामाचा दर्जा योग्य ठेवा, कुणाचीही तक्रार येऊ नये

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात मनपा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा आणि गुणवत्ता नेहमी योग्य राखला जाईल याकडे मक्तेदारांनी लक्ष द्या, अन्यथा कारवाई करण्यात येईल. तसेच मनपातील कुणीही अधिकाऱ्याने पैशांची मागणी केल्यास तक्रार करा, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील कामाचा दर्जा योग्य नसल्याची तक्रार प्राप्त झाल्याने महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले, कुंदन काळे, अभियंता योगेश वाणी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. महापौर जयश्री महाजन यांनी केलेल्या पाहणीत कामाचा दर्जा योग्य असल्याचे दिसून आले. काम चांगल्या प्रकारे करून घेत असल्याने महापौर व उपमहापौरांनी अभियंता योगेश वाणी व मक्तेदाराचे अभिनंदन केले. महापौरांनी सांगितले की, जळगाव शहरात काम करणाऱ्या मक्तेदारांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे. प्रत्येक कामाचा दर्जा उत्तम राहील असेच काम करावे. कामात हलगर्जी केल्यास मक्तेदारावर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना महापौरांनी दिल्या. कोणत्याही मक्तेदाराला मनपा अधिकाऱ्याने पैशांची मागणी केली किंवा कुणीही काही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर थेट माझ्याकडे तक्रार करावी, असे आवाहनदेखील महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे.

Web Title: Monopolists should keep the quality of work right, no one should complain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.