शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

मतदानानंतरचा महिना : उमेदवारांनी दिला गाठीभेटींवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:41 PM

कुणी बाहेरगावी घालविली सुटी

जळगाव/धुळे/नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर जळगाव, धुळे, रावेर, नंदुबार या चारही लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना निकालासाठी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागली. या महिनाभरात काही उमेदवारांनी बाहेरगावी, तर काहींनी परदेशात जाऊन सुट्टी घालविली. तर बहुतांश उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवरच भर दिल्याचे दिसून आले.रक्षा खडसेंनी घेतल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीभाजपाच्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी मतदान आटोपल्यावर विविध गावांना जाऊन मतदारांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. मुंबईत मुले शिकायला असतात. काही काळ त्यांच्या समवेत घालवला. आता मतदार संघात विवाह सोहळे आहेत, तेथे जाऊन गाठीभेटी घेणे सुरू आहे.डॉ.उल्हास पाटील यांनी दिल्या अनेक गावांना भेटीकॉँग्रेसचे रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी काही गावांना भेटी दिल्या. कार्यकर्त्यांशी व नागरिकांशी संवाद साधला. अनेक सामाजिक कार्यक्रम तसेच विवाह सोहळे, सुख, दु:खाच्या ठिकाणांना भेटी देणे अविरत चालूच आहे. उर्वरित वेळ रूग्णसेवेत घालविल्याचे सांगितले.उन्मेश पाटील यांचा पदाधिकाऱ्यांशी संवादजळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार उन्मेश पाटील यांनी प्रमुख गावांना जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. केंद्राशी संबंधीत विविध विभागांशी संबंधीत कामांची यादी करून त्याची ब्लु प्रिंट तयार केली आहे. म्हाळगी प्रबोधिनीला भेट देऊन काही विषयांवर अभ्यास केला.देवकरांनी दिल्या विविध गावांना भेटीजळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मतदार संघात जाऊन गाठी-भेटी घेतल्या. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गावागावात होणारे लग्न समारंभ, द्वारदर्शन अशा ठिकाणीही भेटी दिल्या. मुंबईत दोन वेळा पक्ष बैठकांनाही हजेरी लावली.डॉ.सुभाष भामरेंनी पूर्ण केली प्र्रलंबित कामेधुळे लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांनी मतदान झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन आभार व्यक्त केले. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाची प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर दिला. तत्पूर्वी दोन-तीन दिवस विश्राम केला. त्यानंतर पुढील नियोजन केले.आमदार कुणाल पाटील यांचा भेटीगाठींवर भरधुळे लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी मतदान आटोपल्यानंतर पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या तसेच ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेतल्या. मतदारसंघातील लग्नसोहळ्यांना नेहमीप्रमाणे उपस्थिती दिली. आलेल्या कार्यकर्ते, नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडविल्या. यात बराच कालावधी गेला. त्यानंतर चार-पाच दिवसांपासून बैठकींसाठी मुंबई येथील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित झालो असल्याचे सांगितले.अनिल गोटे यांनी दिले शेतीकडे लक्षधुळे मतदार संघातील भाजपाचे बंडखोर उमेदवार अनिल गोटे यांनी शहरालगत असलेल्या शेतामध्ये जाऊन तेथील पिके, झाडे याकडे लक्ष दिले. तेथे पाळलेल्या कुत्र्यांसोबत राहिलो, रमलो. त्यांच्या आवश्यक गरजा व उपचारांकडे लक्ष पुरविले. वेळोवेळी कार्यबाहुल्यामुळे राहून गेलेल्या व आवडणाºया पुस्तकांचे वाचन केले. लिखाणाचे कामही केले. या दरम्यान बाहेरगावी कुठेही गेलो नाही, असे सांगितले.डॉ.हीना गावित सुटी घालविण्यासाठी विदेशातमतदान आटोपल्यावर विद्यमान खासदार डॉ.हीना गावीत यांनी कार्यकर्त्यांच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. याच काळात पिता आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या डोळ्यांवर मुंबईत शस्त्रक्रिया झाली. त्यांच्यासोबत रुग्णालयात काही दिवस त्या होत्या. त्यानंतर आईसोबत सुटी घालवण्यासाठी त्या विदेशात गेल्या आहेत.अ‍ॅड.पाडवी यांनी लावली कार्यक्रमांना हजेरीनंदुरबार मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी मतदानानंतर आपल्या असली, ता.धडगाव या गावाकडे सुटी घालवली. कार्यकर्त्यांकडील लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांना हजेरी लावली. पक्षाच्या मुंबई येथील बैठकीसाठीही ते गेले होते.डॉ.नटावदकर नंदुरबारातचअपक्ष उमेदवार डॉ.सुहास नटावदकर यांनीही नंदुरबारातच राहून लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांना हजेरी लावली. याच काळात शेतकऱ्यांच्या एका मोर्चातही ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव