जळगाव शहरातच शंभरापेक्षा अधिक रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:25 AM2021-05-05T04:25:40+5:302021-05-05T04:25:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सोमवारी जिल्हाभरात केवळ जळगाव शहरात १७१ बाधित रुग्ण आढळून आले असून अन्य सर्व तालुक्यांमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सोमवारी जिल्हाभरात केवळ जळगाव शहरात १७१ बाधित रुग्ण आढळून आले असून अन्य सर्व तालुक्यांमध्ये शंभरापेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या ९०० वरून ८०० वर आली आहे. मात्र, दुसरीकडे चाचण्यांची संख्याही घटली आहे. नियमितपेक्षा निम्म्याने ॲन्टिजेन चाचण्या कमी झाल्या आहेत.
जळगाव ग्रामीणमध्ये गेल्या दोन दिवसांपासून रुग्णसंख्या वाढली आहे. सोमवारी ६४ रुग्ण आढळून आले आहेत. तर ३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ग्रामीणमधील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ४२६ वर पोहोचली आहे. जळगाव शहरात एका ६५ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद आहे. यासह जामनेरात ४, भडगाव, पाचोरा येथे प्रत्येकी ३, चोपडा, रावेर, बोदवड प्रत्येकी २, मुक्ताईनगर अमळनेर प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
चाचण्या घटल्या
गेल्या दोन दिवसांपासून ॲन्टिजेन चाचण्या घटल्या आहेत. सेामवारी जिल्हाभरात ४३३५ ॲन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. ज्या गेल्या काही दिवसांच्या तुलनेत निम्म्याने कमी आहेत. तर आरटीपीसीआरचे २०९६ अहवाल आले तर १०२९ आरटीपीसीआरचे अहवाल तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या घटली
ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या १६०० वर पोहोचली होती. ही संख्या गेल्या तीन दिवसांपासून कमी झाली आहे. सोमवारी १३३८ रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत होतो. तर ७६३ रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
टॉप ५ तालुके
जळगाव २३५
एरंडोल ७३
भुसावळ ६९
चाळीसगाव ६९
रावेर ६४