मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक : दुपारी एक वाजेपर्यंत ३० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 01:06 PM2018-07-15T13:06:37+5:302018-07-15T13:07:21+5:30

सकाळी 7.30 वाजेपासून मतदानास सुरुवात

Muktainagar Nagar Panchayat Election: More than 30 percent polling till one o'clock in the afternoon | मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक : दुपारी एक वाजेपर्यंत ३० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक : दुपारी एक वाजेपर्यंत ३० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

Next
ठळक मुद्देलोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी तिरंगीनगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 73 उमेदवार रिंगणात

जळगाव : भाजपा नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीसाठी दुपारी एक वाजेपर्यंत ३० टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
रविवारी सकाळी 7.30 वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी तिरंगी तर नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 73 उमेदवार रिंगणात आहेत. एकनाथराव खडसे यांचा हा मतदार संघ असल्याने जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे. या निवडणुकीत भाजपाच्या विरोधात शिवसेना- राष्ट्रवादी अशी आघाडी आहे.
एकूण 23 हजार 726 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी (महिला) राखीव आहे. यासाठी भाजपाच्या नजमा इरफान तडवी, शिवसेनेच्या ज्योती दिलीप तायडे आणि काँग्रेसच्या माधुरी आत्माराम जाधव यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
भाजपाने सर्वच्या सर्व म्हणजे 17 जागांवर उमेदवार दिले आहेत. तर शिवसेनेच्यावतीने 13, काँग्रेस 7 तर राष्ट्रवादी काँग्रेस फक्त 3 जागा लढवित आहे. पक्षाच्या चिन्हावर प्रथमच निवडणूक लढविली जात आहे.
 

Web Title: Muktainagar Nagar Panchayat Election: More than 30 percent polling till one o'clock in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.