नंदाबाई सूर्यवंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:15 AM2021-04-12T04:15:25+5:302021-04-12T04:15:25+5:30
शिरसोली : नंदाबाई सूर्यवंशी (६८) यांचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा ...
शिरसोली : नंदाबाई सूर्यवंशी (६८) यांचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या सेवानिवृत्त टेलिफोन ऑपरेटर भाऊसाहेब सूर्यवंशी यांच्या पत्नी होत.
--
तुळशीदास कोल्हे
जळगाव : तुळशीदास कोल्हे (६०, रा. भादली बु.) यांचे रविवारी अल्पशा आजाराने वसई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. पुरुषोत्तम कोल्हे यांचे ते भाऊ होते.
--
इंदूबाई खोडपे
जळगाव : इंदूबाई खोडपे (रा. नेरी बुद्रुक, जामनेर) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. नेरी बुद्रुक माजी सरपंच अरविंद खोडपे यांच्या त्या पत्नी होत.
--
नाना पाटील
जळगाव : शेतकी संघाचे संचालक नाना पाटील (५१, रा. भादली) यांचे अल्पशा आजाराने रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार भाऊ, मुलगा, दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. स्वामी समर्थ शैक्षणिक मंडळाचे चेअरमन मनोज पाटील यांचे मोठे भाऊ होत.
--
प्रभाकर वाणी
जळगाव : प्रभाकर वाणी (सोनवदकर) (७२, रा. पुणे) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
--
बळीराम चौधरी
जळगाव : रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य बळीराम चौधरी (८५, रा. नवी मुंबई) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. डॉ. अतुल चौधरी यांचे ते वडील होत.
--
सुधाकर पाटील
जळगाव : सुधाकर पाटील (६०, रा. सदाशिवनगर, जुनाखेडी रोड) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई व नात असा परिवार आहे. हेमलता चौधरी यांचे ते वडील होत.
--
सुकलाल चौधरी
जळगाव : सुकलाल चौधरी (रायगडे) (८३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नंदू रायगडे यांचे ते वडील होत.
--
शरद कुळकर्णी
जळगाव : शरद कुळकर्णी (नेरीकर) (८४, रा. डेमला कॉलनी, रिंग रोड) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नाती असा परिवार आहे.
--
राजेंद्र सपके
जळगाव : राजेंद्र सपके (५२, रा. मारोतीपेठ, धोबीवाडा) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, चार भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रमेश सपके यांचे ते लहान भाऊ होत.
--