नशिराबाद: येथील ग्रामपंचायतच्या मालमत्ता कराची वीज वितरण कंपनीकडे थकबाकी सुमारे ४८ लाख ४८ हजार १२१ रुपये आहे. तर वीज कंपनीचीसुद्धा ग्रामपंचायतीकडे लाखोंची थकबाकी थकीत आहे. त्यामुळे वीज कंपनीने ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यासह कार्यालयाची वीज खंडित केली आहे. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच विकास पाटील, प्रशासक अर्जुन पाचवणे, ग्रामविकास अधिकारी बी.एस. पाटील यांच्यासह स्थानिक अन्य लोकप्रतिनिधीं व सामाजिक कार्यकर्ते यांचे शिष्टमंडळ सोमवारी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एन.बी. चौधरी यांची भेट घेऊन दोघांकडे असलेल्या थकीत वेतनाबाबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. वीज वितरण कंपनीकडे ग्रामपंचायतीच्या कराची थकबाकीबाबत आम्हाला वेठीस धरू नका...पाणी द्या... यासंदर्भात शनिवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते त्याची दखल घेत शिष्टमंडळ अधिकाऱ्यांची भेट घेत आहे.
नशिराबाद शिष्टमंडळ घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:15 AM