भुसावळ येथे नाहाटा कॉलेजला जीवशास्त्रावर राष्ट्रीय परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 09:36 PM2020-01-13T21:36:00+5:302020-01-13T21:37:18+5:30
भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. वाणिज्य महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभागातर्फे ‘जीवशास्त्रातील नवीन विचार प्रवाह’ या विषयावर सोमवारी एक दिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली.
भुसावळ, जि.जळगाव : येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. वाणिज्य महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभागातर्फे ‘जीवशास्त्रातील नवीन विचार प्रवाह’ या विषयावर सोमवारी एक दिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. परिषदेत ११५ संशोधक प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, कोषाध्यक्ष जयकुमार नाहाटा यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी सचिव विष्णू चौधरी होते. प्राचार्या डॉ.मीनाक्षी वायकोळे, विद्यापीठ प्राणीशास्त्र अभ्यास मंडळ प्रमुख डॉ.पी.एस.लोहार, विद्यापीठ वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळ सदस्य डॉ.एस.ए.पाटील, परिषदेचे संयोजक उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.ब-हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि सिनेट सदस्य प्रा.ई.जी.नेहेते, डॉ.संध्या सोनवणे, डॉ.शिरीष झांबरे, डॉ.एस.आर.महाजन,डॉ.एम.जी.पाटील, सहसंयोजक डॉ.डी.के. हिवराळे, संघटन सचिव डॉ.विद्या पाटील, संघटन सचिव डॉ.एम.जे.जाधव यांची उपस्थिती लाभली.
चार सत्रात परिषद
प्रथम सत्रात प्रा.डॉ.पी.एस.लोहार यांनी संगणकाचे वर्गीकरण शास्त्रातील योगदान या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात डॉ.एस.ए.पाटील यांनी बायोपायरसी : मोनोपोलीझिंग नॅचरल रिसोर्सेस यांनी या विषयावर पॉवरपॉइन्टच्या साहाय्याने मार्गदर्शन केले.
तृतीय सत्रात संशोधक शोधनिबंधांचे वाचन तसेच पोस्टर प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये प्रथम- ज्योती अशोक पांडे, द्वितीय-सुभद्रा एम.चावराई तर तृतीय क्रमांक राजश्री नरेंद्र पाटील यांनी पटकावला. शोधनिबंध वाचनात प्रथम क्रमांक आनंद एस.जाधव, द्वितीय क्रमांक महेंद्रकुमार रमेश शिरसाठ यांनी पटकावले. चौथ्या सत्रात परिषदेचा समारोप झाला. उपप्राचार्य व परिषदेचे संयोजक डॉ.एस.व्ही.पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ.डी.एन.पाटील, डॉ.शिरीष झांबरे, डॉ.एस.आर.महाजन, डॉ.एम.जी.पाटिल उपस्थित होते. समारोप समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.एम.जे.जाधव यांनी करून आभार मानले.
संयोजक उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, सहसंयोजक डॉ.डी.के.हिवराळे, संघटन सचिव डॉ.विद्या पाटील, संघटन सचिव डॉ.एम.जे.जाधव, प्रा.ज्योती जंगले, प्रा.डी.एन.बोरीकर, प्रा.मोहिनी पाटील, प्रा.तुषार चौधरी, प्रा.देवेंद्र पाटील, प्रा.उमेश पाटील, प्रा.प्रशांत पाटील, प्रा.शंकर पाटील तसेच विभागातील शिक्षकांनी परिश्रम घेतले.