जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक सप्ताह सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:18 AM2021-09-22T04:18:30+5:302021-09-22T04:18:30+5:30
जामनेर : आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय ...
जामनेर : आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय जंतनाशक सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी दिली.
जंत संसर्गामुळे १ ते १९ वर्षे वयोगटातील मुलामुलींमध्ये विविध प्रकारचे विकार दिसून येतात. जंतामुळे रक्तक्षय होऊन बालकांचा विकास व शारीरिक वाढ यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे बालकांचे कुपोषण होऊन त्यांची वाढ खुंटते. संसर्ग अधिक प्रमाणात झाल्यास बालके सतत आजारी पडून थकवा जाणवणे, पोट दुखणे, एकाग्रता कमी होणे, शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते.
याकरिता वर्षातून दोन वेळा ‘जंतनाशक मोहीम’ आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येते. तालुक्यात दहा हजार ८९२ इतक्या दोन वर्षापर्यंतच्या बालकांना व दोन लाख ३४ हजार २५० अशा दोन वर्षे ते एकोणीस वर्ष वयाच्या बालकांना जंतनाशक डोसची मात्रा देण्यात येणार आहे, असे डॉ.राजेश सोनवणे यांनी सांगितले.