कुजबुज (आकाश नेवे)
जिल्हाधिकारी कार्यालयात बहुतेक जण आपली कामे घेऊन येतात. त्यात ठेकेदार, समस्या घेऊन येणारे नागरिक यांचा समावेश असतो. जिल्हाधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकारी वगळता कुणीही आले तरी सर्वांना पार्किंगमध्ये आपली गाडी लावावी लागते. आणि चालत पुढे जावे लागते. मात्र एक दाढीवाला बाबा आपली दुचाकी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कारच्या बाजूला लावतो. आणि ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना, कोरोना कसा नाही, केंद्रातील सरकार कसे चुकीचे आहे यावर प्रवचन देतो. ड्युटीवरील पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांचे त्याने काही काळ मनोरंजन होते. मात्र त्याला ते प्रेमाने समजावून पाठवतात. त्यानंतर हाच दाढीवाला बाबा जिल्हापेठ पोलीस ठाणे, रामानंद नगर पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातदेखील असाच प्रकार करतो. त्यामुळे आता त्याची ‘फटफटी’ आली रे आली की बहुतेकजण म्हणतात ‘साहेब आला रे भौ...’