शिरसमणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 05:31 PM2021-02-12T17:31:37+5:302021-02-12T17:32:45+5:30

सरपंचपदी रोहिदास पाटील यांची निवड झाली.

NCP has power over Shirasmani Gram Panchayat | शिरसमणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता

शिरसमणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता

googlenewsNext
ठळक मुद्देसरपंचपदी रोहिदास पाटील उपसरपंचपदी नीलिमा पाटील बिनविरोध 

पारोळा : तालुक्यातील शिरसमणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली असून, सरपंचपदी रोहिदास भिका 
पाटील तर उपसरपंचपदी नीलिमा  योगेश पाटील बिनविरोध करण्यात आली.
सरपंच व उपसरपंच पदासाठी १२ रोजी निवडणूक घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य निंबा दयाराम माळी , विजय भास्कर पाटील, देवीदास मदन पवार, भीमराव नरसिंग राठोड, गोरख मंगा भिल, निलाबाई नाना पाटील, कुसुमबाई दिनकर पाटील, रूपाली सतीश पाटील, लताबाई दादाभाऊ पाटील, कौशल्याबाई भुरा पवार, कविता स्वप्नील पाटील, नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत संत उदासी बाबा परिवर्तन पॅनलने तेरापैकी १२ जागांवर विजय मिळवत एक हाती सत्ता संपादन केली. 
मागील पंचवार्षिक निवडणुकीत अवघ्या एका मताने राष्ट्रवादीची सत्ता हुकल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती.या निवडीबद्दल माजी मंत्री डॉ.सतीश पाटील,  माजी खासदार अँड.वसंतराव मोरे, जि.प. सदस्य रोहन पाटील,  हिंमत पाटील, माजी सभापती मनोराज पाटील अभिनंदन केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.ए.पाटील यांनी काम पाहिले तर ग्रामसेवक डी.आर.पाटील, कोतवाल एकनाथ पाटील यांनी सहकार्य केले.
 

Web Title: NCP has power over Shirasmani Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.