आज गांधीची गरज, मात्र ‘गांधी’ तयार होणे कठीण - डॉ.भालचंद्र नेमाडेंनी व्यक्त केली खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:40 PM2019-12-26T12:40:03+5:302019-12-26T12:40:29+5:30
नाणार मलबार हिलवर करा
जळगाव : सध्याचा काळात मानवी मुल्य हरवत जात आहेत. मानवी मेंदूची उत्क्रांती थांबत जात असल्याने जगात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण होत आहे. अशा काळात महात्मा गांधीची यांची गरज आहे. मात्र, मूल्य हरवत जाणाऱ्या समाजात गांधी निर्माण होणे कठीण असल्याची खंत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी बुधवारी डॉ.जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली.
लेवा एज्युकेशन युनियनच्या शताब्दी महोत्सव समारोप समारंभ निमित्त डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयाच्या प्रागंणात आयोजित कार्यक्रमात डॉ. नेमाडे हे बोलत होते. अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एन.के.ठाकरे हे होते. लेवा एज्युकेशन युनियनचे अध्यक्ष डॉ. सुभाष चौधरी, उपाध्यक्ष अरुण नारखेडे, सचिव एन.एस.पाटील, सहसचिव डॉ.डी.के.टोके, संचालक किरण बेंडाळे, व.पु.होले, डॉ.अरुणा पाटील, जी.ई.पाटील, प्रा.एल.व्ही.बोरोले, प्राचार्य डॉ.एस.एस. राणे उपस्थित होते. संस्थेच्या १०० वर्षाच्या ‘फोटो बायोग्राफी’चे प्रकाशन झाले.
मुंबईपासून दिल्ली, लंडन सडत जात आहे
नेमाडे म्हणाले की, मेंदूची उत्क्रांती थांबल्यामुळे प्रगती थांबली आहे. खानपानातील बदल, उलटा विचार करणाऱ्यांची वाढत जाणारी संख्या, यामुळे स्त्रियांवरील अत्याचारांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळेच सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील नागरिक हे सारखेच असतात, सर्व देशांमधील नागरिक हे प्रेमळ असतात. मात्र, राजकारण्याकडून राष्ट्र संकल्पना स्वार्थासाठी वापरली जात असून, राष्टÑ संकल्पना चुकीच्या पध्दतीने लोकांसमोर मांडली जात आहे. यामुळे मुंबईपासून, दिल्ली, लंडन हे सडत जात असल्याचेही नेमाडे यांनी सांगितले.
निसर्गरम्य कोकणात रिफायनरी करण्यापेक्षा मलबार हिल वर करा
सध्या आपण मूल्य ठरविताना कोणताही विचार करत नाहीत. जे आवश्यक आहेत त्या मुल्यांना सोडून इतर मुल्य स्विकारण्याची धडपड सध्या सुरु आहे. निसर्गरम्य कोकणात रिफायनरी तयार करून त्या ठिकाणचा निसर्ग का नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे ? हे एक कोडं आहे. रिफायनरी तयार करायची असेल तर ती मलबार हिलवर तयार करा असा सल्ला नेमाडे यांनी दिला. निसर्गातील प्राणी, पक्षी, वृक्ष हे आज तर शिल्लक असतील किंवा त्यांचा बचाव होत असेल तर तो केवळ अडाणी समजल्या जाणाºया लोकांकडूनच होत आहे. तरे सुशिक्षित लोकांमुळे कोणतेही प्रयत्न निसर्ग वाचविण्यासाठी केला जात नसल्याचे दिसून येते.
बेबीसीटर चालते मग सासू का नाही
नागरिकांनी आधुनिकतेतून काय घ्यावे आणि जुन्या पध्दतीतुन काय सोडावे यावर लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या परंपरेत सर्व काही टाकण्यासारखे नाही असे मत नेमाडे यांनी व्यक्त केले. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचे खुळ वाढत चालले आहे. मातृभाषा जगवायला हवी. इंग्रजी ही विश्वभाषा नाही असे सांगून नेमाडे यांनी भाषेच्या विविध गमतीजमती सांगितल्या.
स्व:तचे विचार बळकट करा
सध्या देशात राम मंदिर, नागरिकत्व कायदा अशा गोष्टींमुळे विचार करणाºयाला कळत नाही की आपण काय विचार करतो. आता वेळ आली आहे की, प्रत्येकाने आपल्या विचारपध्दतीत बदल करण्याचीत्न े. डॉ.एन.के.ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.मनीषा पाटील यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील, संघपती दलुभाऊ जैन आदी उपस्थित होते.