नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:07 AM2021-01-24T04:07:53+5:302021-01-24T04:07:53+5:30
ला़ ना़ विद्यालयातील मुख्याध्यापक दुर्गादास मोरे यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन झाले. व्यासपीठावर भारती गोडबोले, बापू साळुंखे, स्मिता एडके, रेवती ...
ला़ ना़ विद्यालयातील मुख्याध्यापक दुर्गादास मोरे यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन झाले. व्यासपीठावर भारती गोडबोले, बापू साळुंखे, स्मिता एडके, रेवती किन्हीकर, ए. व्ही. चौधरी उपस्थित होते. मुख्याध्यापक दुर्गादास मोरे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आनंदा चौधरी यांनी केले.
नूतन मराठा महाविद्यालय
नूतन मराठा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. ए. बी. वाघ, संजय पाटील, ई. आर. सावकार उपस्थित होते. प्रमुख वक्ते प्रा. राजेंद्र बोरसे यांनी नेताजींच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी कार्यक्रमात लता पवार, भारती पाटील, प्रा. मोरे, प्रा. गायकवाड, सोनाली कचरे आदींची उपस्थिती होती.
जय दुर्गा माध्यमिक विद्यालय
जय दुर्गा माध्यमिक विद्यालयात प्रतिमेचे मुख्याध्यापक सागर कोल्हे यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी महेंद्र पाटील, सविता पाटील यांची उपस्थिती होती.
काशीबाई कोल्हे विद्यालय (फोटो)
काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयात उपमुख्याध्यापक ए. व्ही. ठोसर यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी एच. जी. काळे, एस. डी. खडके, व्ही. आर. कोल्हे, बी. एस. राणे, एस. एस. मोरे, बी. बी. देवरे, जी. बी. पवार, व्ही. पी. शुक्ल, के. एच. घुले आदींची उपस्थिती होती.
आदर्श विद्यालय
कानळदा येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक के. पी. चव्हाण यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. याप्रसंगी व्ही. जे. पवार यांची उपस्थिती होती. के. एम. विसावे, एम. जे. पाटील आदींची उपस्थिती होती.
झिपरू अण्णा बालविहार
झिपरू अण्णा बालविहार येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनकार्याची माहिती देऊन आठवणींना उजाळा शिक्षकांनी दिला. प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा येवले, नेमचंद येवले, हेमांगी येवले यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रवीण कोळी यांनी केले.
बालनिकेतन विद्यामंदिर (फोटो)
कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिरात मुख्याध्यापक राजेंद्र माळी व नीलेश नाईक, श्रीकांत पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. नंतर श्रेयस पांचाळ, गीतेश वाघमारे, दुर्गेश सोनवणे या विद्यार्थ्यांनी नेताजींची वेशभूषा साकारली होती. सूत्रसंचालन वंदना नेहते यांनी केले तर यशस्वीतेसाठी नरेंद्र वारके, उज्ज्वला जाधव, रशिदा तडवी, राहुल धनगर, राजेंद्र पवार, संगीता निकम, सुवर्णा सोनार, ज्योती सपकाळे, छाया पाटील, स्वाती याज्ञिक आदींनी परिश्रम घेतले.
महाराणा प्रताप विद्यालय
प्रेमनगरातील महाराणा प्रताप विद्यालयात मुख्याध्यापिका साधना शर्मा यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. नंतर नेहा मापारे, मुस्तफिन नदाफ, सुमित साळवे यांनी देशभक्तीपर गीत सादर केले तर सिद्धांत अहिरे, मुबारक पटेल, प्रशांत सोनवणे यांनी भाषणे केली. सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक डी. एस. पाटील, डी. बी. सोनवणे व शिक्षक उपस्थित होते.
चांदसरकर प्राथमिक विद्यामंदिर
गिरिजाबाई नथ्थूशेठ चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. याावेळी मुख्याध्यापक श्याम ठाकरे, जयश्री पाटील, स्वप्निल भोकरे, महेश तायडे, भूषण अमृतकर यांनी परिश्रम घेतले.
आर. आर. विद्यालय
आर. आर. विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापक व्ही़ एस़ रोकडे व डी. टी. पाटील यांनी प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी डी. बी.पांढरे यांनी कार्याची माहिती दिली. बापूराव पानपाटील, आर. एस़ सोनवणे, डी़ बी़ साळुंखे, ए़ एन. सपकाळे, जी. जे. सोनवणे, पी. पी. रस्से, व्ही. एम. ढाके, के. पी. माळी, आर. एन. भदाणे, एस. एन. कोळी, पी. आर. श्रावगी, आर. बी. महाजन आदींची उपस्थिती होती.
रत्ना जैन प्राथमिक विद्यालय
रत्ना जैन प्राथमिक विद्यालयातील शेठ भिकमचंद जैन सभागृहात प्रभारी मुख्याध्यापिका आशा साळुंखे यांनी प्रतिमा पूजन केले. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.