पिंप्राळा येथील नाल्याचा प्रवाह प्लॉट न १५ मधून मनपाचा नला बेकायदेशीररित्या वाहत आहे़ या प्रवाहाचा मुळ नकाशाच्या भागातील १४ व १५ मध्ये नसून हा नाला तत्कालीन नगरसेवकांनी पदाचा गैर वापर करीत नाल्याचा प्रवाह प्लॉट१५ मधून वळवला आहे़ या नाल्यामुळे प्लॉट नं १४च्या आतील भागातील तळ हे मागील दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने माझ्या घराचे अतोनात नुकसान होऊन मला ८ ते दहा लाखांचा भुर्दंड सोसावा लागला आहे़ प्रत्यक्षात मनपा नगरसेवकांचे पाप आमच्या माथी मारून चोराच्या उलटया बोंबा या म्हणीनुसार आम्हाला पत्र देऊन आपल्या पापांवर पांघरूण घालण्याचे काम मनपाच्या नगररचना विभागाकडून होत आहे़ मी एक प्राथमिक शालेय शिक्षण संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे़ मी सतत ३ ते ४ वर्षांपासून वरील सर्व संबधितांना पत्र व्यवहार करून प्रत्यक्ष कल्पना दिली आहे़ मी गेल्या चार ते पाच वर्षांपासून अतिवृष्टीमुळे माझे मिळकतीचे अतोनात नुकसान झाल्याने मला बँक व वेगवेगळ्या वित्त संस्थेतून कर्ज काढून झालेल्या नुकसानीचे बांधकाम करावे लागत आहे़ या कारणाने कर्जाचे ओझे माझ्यावर आहे़ माझ्या सर्वस्व खर्चास व नुकसानीस महापालिका नगरचना विभाग व मनपा प्रशासन जबादार आहे़ मनपा प्रशासन, शासन, मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, जिल्हा प्रशासन मुगगिळून गप्प का, एका साधारण महिलेने याबाबतीत आवाज उठविला म्हणून माझा आवाज दाबवण्याचा केविलवाणा प्रकार चालविला आहे़ माझ्या सारख्या सामान्य नागरिकास न्याय मिळेल का, राज्यात भाजपाचे सरकार आल्याने मला असे वाटत होते की हे जनसामान्यांचे सरकार आहे़ पण फक्त आश्वासन व फसवेगिरी असेच चित्र दिसत आहे़ - संगिता पाटील, नागरिक