सात वाळु गटांच्या ठेकेदारांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:34+5:302021-06-09T04:21:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळु गटांचे लिलाव झाले होते. त्यांची मुदत ९ जून रोजी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळु गटांचे लिलाव झाले होते. त्यांची मुदत ९ जून रोजी संपणार आहे. या सर्व ठेकेदारांनी वाळु गट प्रशासनाकडे जमा केले आहेत. त्यामुळे या सात वाळु गटांच्या ठेकेदारांना आता प्रशासनाने करारातील अटी व शर्तींचा भंग केल्या प्रकरणी कारणे नोटिसा बजावल्या आहेत.
यात टाकरखेडा गट - व्ही.के एन्टरप्रायजेस, वैजनाथ - श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर, बांभोरी-पटेल ट्रेडिंग कंपनी, उत्राण १ महेश माळी, उत्राण दोन एम.एस.बिल्डर्स, नारणे-सुनंदाई बिल्डर्स. आव्हाणे-स्टार बालाजी लॉटरी यांना जिल्हा प्रशासनाने करारातील अटी व शर्तींचा भंग केल्या प्रकरणी नोटिसा बजावल्या आहेत.
बाभुळगावच्या गटाचा पेच
गिरणा नदीवरील बाभुळगाव ता. धरणगाव येथील वाळु गटाचा पेच निर्माण झाला आहे. १२ मे रोजी झालेल्या तिसऱ्या लिलावात हा गट पटेल ट्रेंडिंगने घेतला होता. त्यात १ कोटी ११ लाख रुपयांत त्यांनी हा गट घेतला. त्याची ऑफसेट किंमत १ कोटी रुपये होती. त्यानंतर ठेकेदाराने २५ टक्के रक्कम भरली. उरलेली रक्कम भरण्याची मुदत एक महिना देण्यात येते. मात्र रक्कम भरण्याच्या मुदतीचा एक महिना संपण्याच्या आधीच वाळु गटांची मुदत संपणार आहे. जिल्ह्यातील सर्व वाळु गटांची मुदत ९ जून रोजी संपणार आहे. त्यानुसार या वाळु गटातून ठेकेदार १० जून पासून वाळु उचलु शकणार नाही. त्यामुळे या वाळु गटाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. शासनाच्या अध्यादेशानुसार १० जून ते ३० सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळात वाळु गट बंद करण्यात येतील. तसेच जिल्हा प्रशासनाने निविदा काढतांना देखील १० जून या मुदतीचाच उल्लेख केला होता.