आता अन्य व्हेंटिलेटरची घेतली जातेय माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:21 AM2021-08-14T04:21:53+5:302021-08-14T04:21:53+5:30
जळगाव : जिल्हा रुग्णालयाने मोहाडी रुग्णालयात खरेदी करण्यात आलेल्या ३० व्हेंटिलेटरच्या चौकशीत आता अन्य व्हेंटिलेटर सोबत या व्हेंटिलेटरचे स्पेसिफिकेशन ...
जळगाव : जिल्हा रुग्णालयाने मोहाडी रुग्णालयात खरेदी करण्यात आलेल्या ३० व्हेंटिलेटरच्या चौकशीत आता अन्य व्हेंटिलेटर सोबत या व्हेंटिलेटरचे स्पेसिफिकेशन योग्य आहे का? याची पडताळणी केली जात आहे. यानंतर हा अहवाल दिला जाणार असल्याने या अहवालाची प्रतीक्षा लागून आहे.
शुक्रवारी समिती या चौकशीबाबत अहवाल देणार होती. मात्र, मोहाडी रुग्णालयात लक्ष्मी सर्जिकलने पुरविलेले व्हेंटिलेटर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खरेदी केलेले व्हेंटिलेटर यांचे स्पेसिफिकेशन एकमेकांशी मॅच करून बघा, दोघांमध्ये काय तफावत आहे ती नोंदवा, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चव्हाण यांनी सांगितले, त्यानुसार समिती आता या व्हेंटिलेटरचे स्पेसिफिकेशन बघणार आहे. त्यानंतर शनिवारी याबाबत अहवाल दिला जाणार असल्याची माहिती आहे.
प्रकरण दडपण्याचा घाट
मुळात मी तक्रार मॉडेल बदल्याबाबत दिलेली आहे. मात्र, आता अन्य व्हेंटिलेटरची पडताळणी करून खरेदी केलेले व्हेंटिलेटर कसे योग्य आहे हे पटवून देण्याचा खटाटोप यात सुरू आहे. जर बिले दिली गेली नाही, मॉडेल बदलेले आहे, मुदत संपलेली आहे, मग निविदा का रद्द करण्यात आली नाही, असे तक्रारदार माहिती अधिकार कार्यकर्ते भोळे यांनी म्हटले आहे.