मे मध्ये बरे होणाऱ्यांच्या संख्येत साडे चार हजाराने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:36+5:302021-06-04T04:13:36+5:30
जळगाव : मे महिन्यात आढळुन आलेल्या कोरोना बाधित रुग्णांपेक्षा ४ हजार ७३४ अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...
जळगाव : मे महिन्यात आढळुन आलेल्या कोरोना बाधित रुग्णांपेक्षा ४ हजार ७३४ अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मे महिन्यात २२ हजार ७१५ जण बरे होऊन घरी गेले आहेत तर १७ हजार ९८१ नवे बाधित आढळले आहेत.
१५ फेब्रुवारी पासून कोरोना बाधिताची संख्या वाढण्यास सुरूवात झाली. त्यानंतर शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची लाट थोपविण्यात प्रशासनाला यश आले आहे. गेल्या दोन महिन्यात प्रशासनाने नियम कडक केले. त्यासोबतच टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट यावर भर दिल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली.
फेब्रुवारी
बाधित ३,८४४
बरे झालेले १६५०
मार्च
बाधित २८ हजार १४०
बरे झालेले १८६०२
एप्रिल
बाधित - ३२,९८६
बरे झालेले - ३३,५६९
मे
बाधित १७,९८१
बरे होणारे २२,७१५