शहरातील हॉटस्पॉटमधील रुग्ण घटताय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:17 AM2021-04-09T04:17:09+5:302021-04-09T04:17:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील काही विशिष्ट भागात मध्यंतरी मोठ्या प्रमााणात रुग्ण आढळून येत होते. या हॉटस्पॉटमधील रुग्णसंख्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील काही विशिष्ट भागात मध्यंतरी मोठ्या प्रमााणात रुग्ण आढळून येत होते. या हॉटस्पॉटमधील रुग्णसंख्या काहीशी घटली आहे. मात्र, कोरेानाचा संसर्ग हा सर्व शहरातच विखुरला असून सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात रुग्ण समोर येत आहे. गुरूवारी शहरात २९९ नवे कोरोना बाधित आढळून आले असून ४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. २६५ रुग्ण बरे झाले आहेत.
शहरातील पिंप्राळा, खोटेनगर, रामेश्वर कॉलनी, दादावाडी असे काही भाग सातत्याने हॉटस्पॉट म्हणून समोर आले होते. या भागात नियमीत दहा पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. ही संख्या कमी होऊन पाच पेक्षा कमी झाली आहे. आता परिसर वाढले असून त्यात रुग्ण विखुरले गेल्याचे समोर येत आहेत. म्हणजे कोरोना पूर्ण शहरभर पसरला असून तपासणी केली तेव्हा बाधितांचे प्रमाण समोर येत आहे. या हॉटस्पॉटमध्ये महापालिका प्रशासनाने तपासणी शिबिरेही घेतली. यातही अनेक रुग्ण समोर आले आहेत.
सर्व वयोगटांना धोका
जळगाव ग्रामीणमध्ये एका बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासह जळगाव शहरात ५० व ८० वर्षीय पुरूष व ५० व ८० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. १५ मृत्यूमध्ये चोपडा तालुक्यातील ३६ वर्षीय महिला, भुसावळ तालुक्यातील ३४ वर्षीय तरूण, रावेर व जळगाव तालुक्यातील प्रत्येकी ४३ वर्षीय प्रौढाचा समावेश आहे. कमी वयाचे मृत्यू नियमीत होत असल्याने कोरोनाचा धोका सर्वच वयोगटासाठी सारखा असल्याचे यातून समोर येत आहे.
चाचण्या अशा
आरटीपीसअीारचे अहवाल १४३८, बाधित ४०७
ॲन्टीजन तपासणी : ६४०१, बाधित ७८३
आरटीपीसीआर तपासण्या १०९५
रुग्णांची स्थिती
उपचार सुरू असलेले : ११७३५
ऑक्सिजन पुवठा करावा लागणारे रुग्ण : १३७५
अतिदक्षता विभागात दाखल रुग्ण : ५२१