संमतीविना अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या पतीविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 09:10 PM2018-10-11T21:10:55+5:302018-10-11T21:16:59+5:30

पतीने संमतीशिवाय अनैसर्गिक अत्याचार व इतरांनी विनयभंग केला आणि जमीन घेण्यासाठी तीन लाख रुपये मागितल्याच्या आरोपावरून सुरत येथील सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Offense against a husband who is unnatural atrocities without consent | संमतीविना अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या पतीविरूद्ध गुन्हा

संमतीविना अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या पतीविरूद्ध गुन्हा

Next
ठळक मुद्देअमळनेर पोलिसात गुन्हा दाखलसुरतमधील जणांना केले आरोपीकोणत्याही व्यक्तीने स्त्रीशी संबध ठेवण्याचे सांगत केला अन्याय

अमळनेर : पतीने संमतीशिवाय अनैसर्गिक अत्याचार व इतरांनी विनयभंग केला आणि जमीन घेण्यासाठी तीन लाख रुपये मागितल्याच्या आरोपावरून सुरत येथील सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेचा विवाह २६ एप्रिल २००७ रोजी उधना यार्डमधील तरुणासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी जमीन घेण्यासाठी ३ लाख रुपयांची मागणी केली जात होती. त्यासाठी छळ सुरू होता. या प्रकाराला कंटाळून महिलेने ५ रोजी पोलिसात तक्रार अर्ज दिला.
त्यात पती, सासू, सासरे, नणंद, नंदोई ( सर्व रा.उधना यार्ड, मदनपुरा अंबिकानगर, सूरत) यांनी त्रास दिला. सासरे व नंदोई यांनी विनयभंग केला.
आमच्याकडे कोणत्याही व्यक्तीने स्त्रीशी संबंध ठेवण्याची परंपरा असल्याचे सांगून अन्याय केल्याचे म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय पतीने अनैसर्गिक अत्याचार केला. अर्जाची चौकशी करून हेकॉ. प्रभाकर पाटील यांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.तपास सपोनि गणेश चव्हाण करीत आहेत.

Web Title: Offense against a husband who is unnatural atrocities without consent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.