भुसावळ : तालुक्यातील गोजोरे गावात जुन्या घराचे खोदकाम करताना चांदीची जुनी नाणी सापडल्याची घटना घडली. मात्र गावात सोन्याची घागर सापडल्याची अफवा पसरल्याने पोलिसांना माहिती देऊन पाहणी करण्यात आली.गुरुवारी दुपारी परशुराम ज्ञानदेव राणे यांचे जुने घर पाडण्याचे काम सुरू होते. यावेळी राणे यांच्या घरातील देवघर (देव्हारा) जवळ सोन्याची घागर सापडल्याची अफवा गावात पसरली. पोलीस पाटील यांनी तालुका पोलीस स्टेशनमध्ये ही माहिती कळवली. तेव्हा पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी याबाबत माहिती तहसीलदार महेंद्र धीवरे यांना दिली.पो नि . कुंभार व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार व पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन येऊन घटनास्थळी पाहणी केली. यावेळी जुन्या काळातील १८६२, १८७२, १८८६ आणि १९०१ या सालातील एकूण १९ नाणी सापडल्याचे सांगण्यात आले . या ठिकाणी सपोनि अमोल पवार व नायब तहसिलदार शशीकांत इंगळे यांनी पंचनामा करून सर्व नाणी सील केली .गावात सोन्याची घागर सापडल्याची अफवा पसरल्याने गोजोरे येथील राणे कुटुंबीयांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. वेळीच पोलीस व महसूलचे अधिकारी व कर्मचारी पोहचल्याने नाण्यांची सत्यता बाहेर आली. या घटनेनंतर गावात मात्र ठिकठिकाणी गावकरी चर्चा करताना दिसत होते.
गोजोरे गावी खोदकामात सापडली जुनी नाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 5:08 PM
जुन्या काळातील १८६२, १८७२, १८८६ आणि १९०१ या सालातील एकूण १९ नाणी सापडल्याचे सांगण्यात आले .
ठळक मुद्देगावात सोन्याची घागर सापडल्याची अफवाजुन्या काळातील १८६२, १८७२, १८८६ आणि १९०१ या सालातील एकूण १९ नाणी