ओम शिवम बिल्ड कॉनने परत केले १ कोटी ६१ लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:13 AM2021-07-15T04:13:55+5:302021-07-15T04:13:55+5:30

बचाव पक्षाच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी न्यायालयात सांगितले की, ठेवीदारांना आरोपींनी २००८ मध्ये त्यांच्या ठेवीपेक्षा कमी रक्कम दिली. ...

Om Shivam Build Con returns Rs 1 crore 61 lakh | ओम शिवम बिल्ड कॉनने परत केले १ कोटी ६१ लाख रुपये

ओम शिवम बिल्ड कॉनने परत केले १ कोटी ६१ लाख रुपये

Next

बचाव पक्षाच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी न्यायालयात सांगितले की, ठेवीदारांना आरोपींनी २००८ मध्ये त्यांच्या ठेवीपेक्षा कमी रक्कम दिली. त्यानंतर आजपर्यंत एकाही ठेवीदारांनी त्याविषयी तक्रार केली नव्हती. पोलिसांनी नोटीस न बजावता अचानक अटकेची कारवाई केली.

यावर सरकारी पक्षाने जामिनाला विरोध करताना आरोपींनी व्याजासह १०० टक्के रक्कम भरावी, अशी मागणी केली. त्यानंतर काही टक्के रक्कम भरण्याची तयारी आरोपींच्या वतीने दाखविण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने काही अटींवर तात्पुरता जामीन मंजूर केला.

...........

बीआरएचच्या आरोपींच्या जामिनावर सुनावणी होणार असल्याने आज न्यायालयात मोठी गर्दी होती. जळगावहून आरोपींचे अनेक नातेवाईक आले होते. सरकार पक्षाने जामिनाला विरोध केल्याने त्यांना जामीन मिळणार का, याविषयी त्यांच्यावर तणाव दिसून येत होता. त्यामुळे नातेवाईकांनी पैसे भरण्याची तयारी दर्शविली.

..........

ओम शिवम बिल्ड कॉनने परत केले १ कोटी ६१ लाख रुपये

ठेवीदारांना ३० ते ४० टक्के पैसे देऊन १०० टक्के पैसे मिळाले असे नोटरी करून घेऊन फसवणूक करणाऱ्या ओम शिवम बिल्ड कॉन कंपनीने अटकेच्या भीतीने आतापर्यंत ८१ ठेवीदारांचे १ कोटी ६१ लाख ८७ हजार रुपये परत केले आहे. पुणे जिल्ह्याबरोबर जळगावमधील काही ठेवीदारांचे पैसे परत केले आहेत.

Web Title: Om Shivam Build Con returns Rs 1 crore 61 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.