लोकमत आॅनलाईनचोपडा, दि.१७ : तालुक्यातील गलवाडे येथील शेतकºयाला हरभरा विक्रीपोटी मिळालेल्या पैशांमध्ये तब्बल एक लाख रुपये व्यापाºयाकडून नजरचुकीने जादा देण्यात आले. तथापि या प्रामाणिक शेतकºयाने हे पैसे सदर व्यापाºयास परत केल्याची घटना गुरूवारी घडली.गणपूर (ता.चोपडा) येथून जवळच असलेल्या गलवाडे येथील शेतकरी राजेंद्र नागो पाटील हे त्यांचा हरभरा शिरपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत विकण्यासाठी गेले होते. त्यांचा हरभरा तेथील मदन बन्सी अग्रवाल या व्यापाºयाकडे विकला गेला. संध्याकाळी शेतकरी राजेंद्र पाटील यांना पेमेंट मिळाले. त्यांनी ते पैसे रूमालात गुंडाळून आणले. दरम्यान, गलवाडे येथे घरी आल्यानंतर त्यांनी पैसे काढले असता, नजरचुकीने आपल्याकडे एक लाख रुपये जास्त आल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी कोणताही विलंब न करता ती माहिती व्यापाºयास कळवली. त्यामुळे व्यापाºयाचा मुलगा राजेश अग्रवाल हा गलवाडे येथे त्याच दिवशी रात्री ८ वाजता गावात आला आणि शेतकºयाने ते लाख रुपये त्याच्याकडे परत केले. यावेळी सरपंच किशोर पाटील, पोलिस पाटील सचिन पाटील, प्रदिप पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रामाणिकपणाबद्दल शेतकरी राजेंद्र पाटील यांचे व्यापाºयांने आभार मानले तर ग्रामस्थांनी कौतुक केले.
हरभरा विक्रीपोटी जादा आलेले एक लाख रुपये शेतकऱ्याने प्रामाणिकपणे केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 5:33 PM
चोपडा तालुक्यातील गलवाडे येथील राजेंद्र पाटील या शेतकºयाने शिरपूर येथील व्यापाºयास विकलेल्या हरभºयाच्या मिळालेल्या पेमेंटमध्ये तब्बल एक लाख नजरचुकीने जादा मिळाले होते. या शेतकºयाने ती माहिती व्यापाºयास कळवून ग्रामस्थांच्या उपस्थितीत ते पैसे परत केले.
ठळक मुद्देव्यवहार झालेल्या दिवशीच पैसे केले परतव्यापाºयाने मानले शेतकºयाचे आभारशेतकºयाच्या प्रामाणिकपणाबद्दल ग्रामस्थांनी केले कौतुक