शेंदुर्णी, ता.जामनेर, जि.जळगाव : येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असलेल्या मजुरांच्या चुली बंद पडू नये म्हणून अनेकांचे मदतीचे हात येत असताना महावीर जयंतीचे औचित्य साधून श्वेतांबर जैन व्यापाऱ्यांकडे घरकाम करणाºया महिला मजुरांना तेल, डाळ, साखर, चहा पावडर, साबण यासह महिनाभर पुरेल एवढा किराणा मोफत देण्यात आला.यावेळी जि.प.चे माजी सदस्य सागरमल जैन यांनी मनोगत व्यक्त केले. आम्ही आज घरगुती काम करणाºया महिलांना जीवनावश्यक किराणा दिला. सर्वांच्या मदतीने मुख्यमंत्री सहायता निधीलासुद्धा जमलेली रक्कम पाठवू, असे सांगितले.यावेळी पारस पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन शांतीलाल जैन, रमेश जैन, कांतीलाल जैन, कस्तुरचंद जैन, सुनील जैन, उर्मिल ललवाणी, शिवलाल राका, नरेंद्र बेदमुथा, मंगेश जैन, शीतल जैन, नगरसेविका भावना जैन, कल्पेश जैन आदी मान्यवरांच्या हस्ते ६० महिलांना दैनंदिन लागणारा एक महिन्याचा किराणा मोफत वाटण्यात आला.भगवान महावीर जयंतीनिमित्ताने केलेल्या कार्याच्या सर्व समाजातून कौतुक होत आहे. महिला मजुरांना मोफत मिळालेला किराणा पाहून चेहºयावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.
श्वेतांबर जैन व्यापाऱ्यांकडून एक महिन्याचा किराणा महिला मजुरांना वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 3:43 PM