जळगावात मित्राच्या भेटीसाठी गेलेल्या तरुणाची मेहरुण तलावात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 08:30 PM2018-01-14T20:30:54+5:302018-01-14T20:46:37+5:30
पुण्याला जाणा-या मित्रांना भेटून येतो असे सांगून घराच्या बाहेर पडलेल्या दुर्गेश राजू ठाकूर (वय २३, रा.खेडी, ता.जळगाव) या तरुणाने मेहरुण तलावात आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी बाहेरचा तणाव किंवा भांडण यातून ही घटना घडल्याची शक्यता दुर्गेशच्या वडीलांनी वर्तविली आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, १४ : पुण्याला जाणा-या मित्रांना भेटून येतो असे सांगून घराच्या बाहेर पडलेल्या दुर्गेश राजू ठाकूर (वय २३, रा.खेडी, ता.जळगाव) या तरुणाने मेहरुण तलावात आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी बाहेरचा तणाव किंवा भांडण यातून ही घटना घडल्याची शक्यता दुर्गेशच्या वडीलांनी वर्तविली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दुर्गेश हा पुणे येथे टाटा मोटर्स या कंपनीत नोकरीला होता. २ जानेवारीपासून तो घरी खेडी येथे आलेला होता. रविवारी सकाळी नळांना पाणी आल्यानंतर वडीलांनी संक्रातीनिमित्त दुचाकी धुतली. त्यानंतर सकाळी आठ वाजता पाण्याची पाच लिटरची कॅन घेऊन तो दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.पी.१५२८) घराबाहेर पडला. जातांना त्याने पुण्याला मित्र रेल्वेने जात असून त्यांच्यासाठी पाणी घेऊन जात असल्याचे सांगितले. बराच वेळ झाल्यानंतर मुलगा घरी आला नाही म्हणून वडीलांनी तसेच लहान भाऊ ऋषीकेश याने त्याला फोन केले, मात्र त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे भाऊ सकाळी अकरा वाजेपासून त्याच्या शोधात असताना त्याने सहज मेहरुण तलावाकडे येऊन बघितले तर तलावाजवळ रस्त्यावर त्याची दुचाकी होती. त्यामुळे भावाने त्याला पुन्हा फोन केला. तरीही प्रतिसाद मिळत नव्हता,परंतु मोबाईलच्या रिंगचा आवाज येत असल्याने ऋषीकेश त्या दिशेने चालत गेला असता तलावाकाठी त्याचे टी शर्ट, मोबाईल व दुचाकीची चावी आढळून आली.
दीड तासाने सापडला मृतदेह
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अशरफ शेख व गोविंदा पाटील यांनी दुपारी दोन वाजता पोहणा-यांना घटनास्थळी आणले. तेव्हापासून दुर्गेश याचा मृतदेह शोधायला सुरुवात केली असता साडे तीन वाजता रवी हटकर या तरुणाच्या हाती मृतदेह लागला. मेहरुण, तांबापुरा येथील पट्टीचे पोहणारे तसेच मनपाच्या कर्मचा-यांनी यासाठी अथक मेहनत घेतली. दीड तासानंतर त्यांना यश आले. तेथून लगेच मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.