यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, राज्य सचिव परमेश्वर बाबर, उपाध्यक्षांच्या समवेत राज्यस्तरीय ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आलेली होती. संघटनेचे राज्य सचिव परमेश्वर बाबर यांची ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे अव्वर सचिवपदी पदोन्नती होऊन नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी सांगितले की, सर्व दिव्यांग कर्मचारी, अधिकारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना कार्यरत आहे. राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन जिल्हास्तरावरील सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
सातारा जिल्हाध्यक्ष हनुमंत अवघडे यांनी बैठक यशस्वी होण्यासाठी मोठे परिश्रम घेऊन तांत्रिक बाबी पूर्ण करत बैठकीचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष महादेव सरवदे, डॉ. शेखर कोगणुळकर, बंडू कुमरे, धनंजय घाटे, अमरावती जिल्हाध्यक्ष राजेंद्र दीक्षित, नांदेड जिल्हाध्यक्ष सुधाकर शेवाळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रावसाहेब शिंदे, बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड, मेश्राम यांनी प्रश्न मांडले. या बैठकीला पद्मिनी कासेवाड, सरकारी वकील जयश्री भटेजा, राज्य संघटना पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार राज्य उपाध्यक्ष महादेव सरवदे यांनी मानले.