एरंडोल, जि.जळगाव : पोषण आहाराच्या चोरीप्रकरणी रिंगणगाव येथील रे.ना. पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व लिपिकाविरुद्ध संस्थेने कारवाई करावी व त्याबाबत अहवाल पाठवावा, असे पत्र जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी संबंधित शिक्षण संस्थेला शनिवारी दिले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.दोन गोण्या कारमध्ये टाकून नेताना...एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे रे.ना.पाटील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक शरद सोनवणे, उपशिक्षक प्रशांत आहिरे व लिपिक मेघराज महाजन यांनी शालेय पोषण आहाराच्या तांदळाच्या दोन गोण्या कारमध्ये टाकून चोरून नेत असताना गावातील काही ग्रामस्थांनी त्यांना गुरुवारी दुपारी रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. गटशिक्षणाधिकारी व्ही.एच.पाटील यांनी शुक्रवारी शाळेत जाऊन याप्रकरणी चौकशी केली व चौकशी अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवला. शनिवारी माध्यमिक शाळा संहितांनुसार संस्थाचालक हे सक्षम नियुक्ती अधिकारी असल्यामुळे त्यांनीच मुख्याध्यापक व इतर कर्मचाºयांवर कायदेशीर कारवाई करावी, असे पत्र माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी रे.ना. पाटील माध्यमिक विद्यालय या शिक्षण संस्थेला दिले आहे.पत्राच्या प्रती दिल्या...शिक्षण विभागाने या पत्राच्या प्रती कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व शिक्षण उपसंचालक यांना पाठवण्यात आल्या आहेत. संस्थेने तत्काळ तातडीची सभा घेऊन याबाबत मुख्याध्यापकास अन्य दोन कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.ग्रामस्थांमध्ये संतापाची लाटशालेय पोषण आहाराच्या तांदळाचा गैरव्यवहार व गैरप्रकार पाहता कुंपणानेच शेत खाल्ले, असा हा प्रकार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांच्या संतापजनक प्रतिक्रिया व प्रक्षुब्घ भावना लक्षात घेऊन संस्थाचालकांनी तत्काळ संबंधित आरोप असलेल्या कर्मचाºयांवर अशी कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
मुख्याध्यापकासह तिघांवर संस्थेने कारवाई करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 5:32 PM
पोषण आहाराच्या चोरीप्रकरणी संस्थेने कारवाई करावी व त्याबाबत अहवाल पाठवावा, असे पत्र जिल्हा परिषदेने संबंधित शिक्षण संस्थेला दिले आहे.
ठळक मुद्देपोषण आहार चोरीप्रकरणशिक्षणाधिकाऱ्यांचे रिंगणगाव माध्यमिक शाळेच्या अध्यक्षांना पत्र