रोगाच्या प्रादुर्भावामुळे पपई उत्पादक संघटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:20 AM2021-08-28T04:20:24+5:302021-08-28T04:20:24+5:30

यामुळे पपई पिकांचे पाने पिवळी पडून पपई मळ्यावरच संकट ओढवले आहे. त्यामुळे तालुक्यातील पपई उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडल्याचे ...

Outbreaks appear to be exacerbated during this time | रोगाच्या प्रादुर्भावामुळे पपई उत्पादक संघटात

रोगाच्या प्रादुर्भावामुळे पपई उत्पादक संघटात

googlenewsNext

यामुळे पपई पिकांचे पाने पिवळी पडून पपई मळ्यावरच संकट ओढवले आहे. त्यामुळे तालुक्यातील पपई उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. या पपई पिकावर औषधी फवारणी करूनही फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर व्हायरसचे प्रसार कमी करण्यासाठी रस शोषण किडींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. त्यामुळे पपई पिकावर आंतर प्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. असे आवाहन भडगाव तालुका कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, भडगाव तालुक्यात यावर्षीही भडगाव, टोणगाव, वडधे, कोठली, निंभोरा, पळासखेडे यासह काही गावांना शेतकऱ्यांनी पपई पिकाची लागवड केलेली आहे. पपई मळा कुठे पपयांनी फुलला आहे. तर कुठे पपई झाडांना पपई फळ लागून पपईचा मळा फुलायला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांनी पपई पिकावर मेहनतीने व मोठा खर्च करून हिरवळीने पपईचे मळे ठिकठिकाणी फुलविल्याचे चित्र दिसून आले. मात्र मागील आठवड्यात सततचा पाऊस बरसल्याने व वातावरणात आर्द्रता आदीमुळे भडगाव, टोणगाव, वढधे, कोठली, निंभोरा यासह शेत शिवारात पपई पिकावर मिलीबग, दावणी, व्हायरस आदी रोगांनी आक्रमण केले आहे. शेतकरी या पपई पिकावर औषध फवारणी करूनही या रोगांना आटोक्यात आणू शकत नाहीत, अशी चर्चा पपई उत्पादक शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे. पपई पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत. तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भडगाव तालुक्यातील पपई नुकसानग्रस्त शेतकरी वर्गातून होत आहे. भडगाव टोणगाव शिवारात इंदल लालचंद परदेशी, संजय लालचंद परदेशी, वढधे येथील विजय लुभानसिंग राजपूत, कोठलीचे विनायक महादू पाटील, कांतीलाल माधवराव पाटील, महेंद्र भोजू पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांचे पपई पिकाचे भडगाव तालुक्यात नुकसान होताना दिसत आहे. शेतकरी मेटाकुटीला आला असून चांगलाच संकटात सापडला आहे. रस शोषण किडींमुळे व्हायरसचा प्रसार होत आहे. व्हायरसचे प्रसार कमी करण्यासाठी रस शोषण किडींचे नियंञण करणे गरजेचे आहे. त्यामुळे आंतर प्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. पपई पिकावर ईमामेक्टीन बेनझाईन, फिनोशॅड आदी औषधीची ४ ग्रम प्रती १० लीटर फवारणी करावी. यामुळे पपई पिकावरचा व्हायरस नष्ट करता येईल. शेतकऱ्यांनी याचा वापर करावा, असे आवाहन भडगाव तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया - भडगाव तालुक्यात जवळपास ५० हेक्टरपर्यंत पपई पिकाची लागवड केलेली आहे. मात्र सततचा पाऊस, आर्द्रता असणारे वातावरण त्यात रस शोषण किडींमुळे पपई पिकावर मिलीबग, व्हायरस आदी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तरी शेतकऱ्यांनी आंतर प्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. व्हायरसचे प्रसार कमी करण्यासाठी रस शोषण किडींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. बी. बी. गोरडे. तालुका कृषी अधिकारी भडगाव.

Web Title: Outbreaks appear to be exacerbated during this time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.