एसएसबीटी महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:14 PM2019-04-22T21:14:38+5:302019-04-22T21:16:20+5:30

जळगााव- बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयात नुकताच पालक मेळावा पार पडला़ या मेळाव्यात पालकांनी विचारलेल्या शंकांचे तसेच प्रश्नांचे निरसण करण्यात ...

 Parents rally at SSBT College excited | एसएसबीटी महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात

एसएसबीटी महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात

Next
ठळक मुद्देदोनशेच्यावर पालकांची उपस्थितीविशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

जळगााव- बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयात नुकताच पालक मेळावा पार पडला़ या मेळाव्यात पालकांनी विचारलेल्या शंकांचे तसेच प्रश्नांचे निरसण करण्यात आले़
मेळाव्याचे उद्घाटन प्रमुख अतिथी शशिकांत कुलकर्णी यांच्याहस्ते दीपप्रज्वालन करून करण्यात आले़ याप्रसंगी प्राचार्य डॉ. के. एस .वाणी, डॉ संजय शेखावत, डॉ जी़ के़पटनाईक,बी़सीक़च्छावा, वाय. के.चित्ते, प्रा़ कृष्णा श्रीवास्तव आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीवास्तव यांनी केले. त्यानंतर प्राचार्य वाणी यांनी यांनी पालक मेळाव्यासाठी असलेल्या सर्व उपस्थितांना महाविद्यालयाची माहिती दिली़ तसेच आज विद्यार्थी काय करतोय या विषयी पालकांनी सजग असावे, असेही त्यांनी सांगितले़ तर प्रमुख अतिथी कुलकर्णी यांनी पालक, विध्यार्थी आणि प्राध्यापक यांनी एका परिवारासारखे हितगुज करावे आणि आवश्यकता असल्यास काही सूचना कराव्यात, असा सल्ला त्यांनी दिला़ मेळाव्यात मार्गदर्शनानंतर विशेष प्राविण्य मिळविणाºया विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला़ मेळाव्यात सुमारे दोनशेच्यावर पालकांची उपस्थिती होती़ पालक मधुसूदन वडनेरकर आणि अशोक धर्माधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले़ तसेच मेळाव्यात पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आल़ सूत्रसंचालन प्रा. सारिका पवार व प्रा़डॉ़सरोज शेखावत यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा़ दीपक बगे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा़ प्रशांत बोरनारे, प्रा़ दीपमाळा देसाई, प्रा़मीरा देशपांडे, प्रा़नितीन जगताप, प्रा़एसक़ेख़ोडे, प्रा़डॉ़एऩबाय़घारे, प्रा़व्ही एस़ पवार आदींनी परिश्रम घेतले़

Web Title:  Parents rally at SSBT College excited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.