परिवर्तनचा आजपासून साहित्य अभिवाचन महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:22 AM2021-02-26T04:22:54+5:302021-02-26T04:22:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : संजीवनी फाऊंडेशन व 'परिवर्तन' संस्थेतर्फे २६ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत ऑनलाईन ...

Parivartancha Sahitya Abhivachan Mahotsav from today | परिवर्तनचा आजपासून साहित्य अभिवाचन महोत्सव

परिवर्तनचा आजपासून साहित्य अभिवाचन महोत्सव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : संजीवनी फाऊंडेशन व 'परिवर्तन' संस्थेतर्फे २६ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत ऑनलाईन व साहित्य अभिवाचन महोत्सव आयोजित केला आहे. यात महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सहभाग राहणार असून साहित्यिकांच्या चर्चासत्राने याची सुरुवात होणार आहे.

पहिल्या दिवशी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी श्रीकांत देशमुख, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ कादंबरीकार प्रवीण बांदेकर हे मान्यवर सहभागी होणार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी जयंत पवार लिखित "तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य" या कथेचं अभिवाचन अतुल पेठे हे करणार आहेत. २८ रोजी बंगाली साहित्यात व जागतिक स्तरावर गाजलेल्या बिभुतीभूषण बंदोपाध्याय लिखित "पाथेर पांचाली" या कादंबरीचे अभिवाचन, १ मार्च रोजी शंभू पाटील लिखित "गांधी नाकारायचा आहे पण कसा?" या नाटकाचे अभिवाचन तर २ रोजी प्रसिद्ध कवी अशोक कोतवालांची कविता परिवर्तनचे कलावंत सादर करतील. ३ मार्चला चंद्रशेखर फणसळकर लिखित 'आमचा पोपट वारला' या कथेचं अभिवाचन अतुल पेठे करतील. महोत्सवाचा समारोप ४ मार्च रोजी भाषा संस्कृतीवरील चर्चेने होणार आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी महोत्सव प्रमुख विनोद पाटील, प्रा. मनोज पाटील, नारायण बावीस्कर, मंजूषा भिडे, होरिलसिंग राजपूत, राहुल निंबाळकर, वसंत गायकवाड, मंगेश कुलकर्णी, डॉ. किशोर पवार, प्रतीक्षा कल्पराज, मोना निंबाळकर आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Parivartancha Sahitya Abhivachan Mahotsav from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.