सीमा तपासणी नाक्यावरून जाऊ न दिल्याने रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 04:57 PM2020-08-19T16:57:32+5:302020-08-19T16:58:15+5:30
संतप्त झालेल्या नागरिकांनी तपासणी नाक्यावर आंदोलन केले. महाराष्ट्राच्या सीमेत असलेला तपासणी नाका हटवण्याची मागणी केली.
मुनाफ शेख
अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर : अंतुर्ली फाटा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश शासनाकडून लावण्यात आलेल्या तपासणी नाक्यावरुन रुग्णाला घेऊन जाणाऱ्या गाडीला जाऊ न दिल्याने मुक्ताईनगर येथील खासगी रुग्णालयात पोहचण्यास विलंब झाल्याने रुग्ण दगावला. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी तपासणी नाक्यावर आंदोलन केले. महाराष्ट्राच्या सीमेत असलेला तपासणी नाका हटवण्याची मागणी केली.
बंडू वामन बावस्कर यांची प्रकृती १९ च्या पहाटे खराब झाल्याने त्यांना खासगी वाहनाने मुक्ताईनगर येथील रुग्णालयात नेत येत होते. अंतुर्ली फाटा येथील मध्य प्रदेशच्या तपसणी नाक्यावर त्यांच्या वाहनाला अडवण्यात आले. मुक्ताईनगर येथील रुग्णालयात घेऊन जात असल्याचे सांगूनसुद्धा तेथील पोलिसांनी जाऊ दिले नाही. त्याना तेथून परत पाठवले. ते नायगाव मार्गे दवाखान्यात गेले. तो ार्यंत रुग्णाचे निधन झाले होते.
आंदोलनाची माहिती मिळताच खासदार रक्षा खडसे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश साळुंके आंदोलनस्थळी दाखल झाले. खासदार खडसे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मध्यप्रदेशातील शेतीशिवारात शेतकऱ्यांना, मजुरांना नायगाव मार्गे रस्ता अत्यंत खराब असल्याने मुक्ताईनगर, जळगाव येथे कामानिमित्त व दवाखान्यात जाण्यासाठी इच्छापूर मार्गे रस्ता चांगला असल्याने अंतुर्ली, पातोंडी व नरवेल येथील लोक जातात. परंतु तपासणी नाक्यावरील पोलीस जाऊ देत नसल्याने लोकांचा उद्रेक अनावर झाला. यानंतर खासदार खडसे यांनी बºहाणपूरच्या जिल्हाधिकाºयांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करून समस्या सांगितली. यामुळे अंतुर्ली फाट्यावरील हा तपासणी नाका शाहपूर रस्त्यावरील शिरसोदा फाट्यावर हलवण्यात आला. परिणामी अंतुर्लीसह परीसरातील नागरिकात समाधान व्यक्त केले.
यावेळी शाहपूर पोलीस स्टेशनचे पो.नि. संजय पाठक, बºहाणपूरचे तहसीलदार गोविंदसिंग रावत, मुक्ताईनगरचे तहसीलदार श्याम वाडकर, पो.नि. सुरेश शिंदे, सरपंच नरेंद्र दुट्टे, कृषी उत्पादन बाजार समितीचे संचालक प्रशांत महाजन, सुनील पाटील, वि.का. संस्थेचे चेअरमन सुधीर तराळ, ताहेरखा पठाण, विलास पांडे, राजू माळी यांच्यासह केळी व्यापारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.