भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे वाहून जाणाऱ्या पाण्याला लोकसहभातून आणले तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 04:20 PM2019-02-12T16:20:30+5:302019-02-12T16:25:49+5:30

महिंदळे परिसरात नाले केटीवेअर पूर्ण कोरडेठाक पडले आहेत व विहिरींनीही तळ गाठला आहे. पण गावाजवळ असलेला पाझर तलाव मात्र याला अपवाद ठरत आहे. परिसरात कुठेही पाणी नसताना पाझर तलावात अजूनही बºयापैकी पाणी साठा आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी व गावातील महिलांना धुणी भांडीसाठी पाझर तलाव उपयोगी ठरत आहे.

The people brought water from Mahaddele in Bhadgaon taluka to the water supply | भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे वाहून जाणाऱ्या पाण्याला लोकसहभातून आणले तलावात

भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे वाहून जाणाऱ्या पाण्याला लोकसहभातून आणले तलावात

Next
ठळक मुद्देपरिसरात विहिरींनी गाठला तळपाझर तलावावर पाणी पिण्यासाठी दूरवरून येतात गुरेपाझर तलावाचे अपूर्ण काम पूर्ण करावेपरिसरात पाण्याचा स्त्रोत म्हणून फक्त एकच पाझर तलाव

भास्कर पाटील
महिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : परिसरात नाले केटीवेअर पूर्ण कोरडेठाक पडले आहेत व विहिरींनीही तळ गाठला आहे. पण गावाजवळ असलेला पाझर तलाव मात्र याला अपवाद ठरत आहे. परिसरात कुठेही पाणी नसताना पाझर तलावात अजूनही बºयापैकी पाणी साठा आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी व गावातील महिलांना धुणी भांडीसाठी पाझर तलाव उपयोगी ठरत आहे.
येथील पाझर तलाव हा स्वातंत्र्य पूर्व काळातील आहे . परंतु यात मोठ्या प्रमाणात गाळ होता. त्यामुळे साठवण क्षमता कमी होती व यात येणारे पाणी अत्यल्प होते. हे गावातील तरुणांनी हेरले व प्रथम लोकसहभागाने यातील गाळ मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी काढून तो शेतात टाकला. परिणामी आपोआप खोलीकरण झाले. परंतु दरवर्षी पावसाच्या प्रमाणात घट होत आहे. तलावात पाणी कमी प्रमाणात येत होते व तलाव डिसेंबर महिन्यातच आटत होता. तलावाला लागून जंगल आहे. त्या जंगलातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात इतरत्र वाहून जात होते. त्या पाण्याला योग्य वळसा कसा घालता येईल याविषयी गावात चर्चा करून गावात वर्गणी गोळा केली. आमदार किशोर पाटील यांच्या सहकार्याने जेसीबी मशीन मिळाले. ग्रामस्थांनी त्यात इंधन पुरवले. दोन किलोमीटरपर्यंत मोठी पाटचारी खोदली. या पाण्यामुळे आज तलावात बºयापैकी जलसाठा आहे. परिसरात यावर्षी दोनच पाऊस पडले आहेत. तरीही तलावात परिसरातील प्राण्यांसाठी पिण्यासाठी पाणी साठा आहे.
परिसरातील विहिरींनी पूर्ण तळ गाठला आहे. परंतु तलावातील पाणी परिसरातील गुरे व पक्ष्यांसाठी जीवनदायी ठरत आहे. लांब अंतरावरुन येथे पाणी पिण्यासाठी पशुपक्षी येत आहेत.
रखडलेल्या तलावाच्या कामाला मुहूर्त मिळेल काय?
गेल्या तीन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून तलावात खोलीकरण, भिंतीची उंची वाढवणे व भिंतीला दोघांची पिंचिंग करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. थोडक्यात खोलीकरण झाले व कामाला ग्रहण लागले. ते आजतागायत लागलेलेच आहे. काम आजही बंदच आहे. या तलावाच्या कामात गैरप्रकार झाला असावा म्हणून इतक्या दिवसांपासून काम बंद आहे. याकडे संबंधित आधिकाºयांनी लक्ष द्यावे व त्वरित अपूर्ण अवस्थेत बंद पडलेले काम सुरू करावे अन्यथा ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत आहेत.

Web Title: The people brought water from Mahaddele in Bhadgaon taluka to the water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.