मतीन शेखमुक्ताईनगर : मुखमंत्री फडणवीस दमानिया यांना वेळ देत होते. भेटत होते. पण मला भेटण्यासाठी वेळ देत नव्हते. याचे पुरावे आहेत. आज उघडपणे सांगतो. मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला. नाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही. स्वस्थ बसणारा नाही. पक्षाच्या नेत्याकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार, असे वक्तव्य माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी गुरुवारी ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी खडसे फार्म हाऊसवर केले, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या पुस्तकाचे आॅनलाईन प्रकाशन केलेअनेक लोक सांगतात, नाथाभाऊवर पक्ष अन्याय करतोय, त्यांचं काहीतरी अडकलं असेल म्हणून पक्ष सोडत नाही, पण स्पष्ट करतो माझं काही अडकलेलं नाही, माझा जीव पार्टी सोबत लागला आहे म्हणून सहन करतोय. पर्याय भरपूर आहेत, असे सांगून त्यांनी बंडाचा इशारा दिला. आमचा मुख्यमंत्री ड्रायक्लिनर होता. सरकारमध्ये कोणावरही आरोप झाले की लगेच क्लिनचिट द्यायचा. मात्र मी निर्दोष असताना क्लिन चिट दिली नाही. नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे हे आमचे नेते शुभेच्छा देताना म्हणतात, नाथाभाऊचे कार्य, योगदान मोठे आहे, नाथाभाऊ चांगला होता तर पक्षाने तिकीट का दिले नाही, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा आवाज का बंद केला, वाण्याब्राह्मणाचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या पक्षाला जुन्या सहकाऱ्यांसोबत बहुजनांचा चेहरा दिला, मग नाथाभाऊवर अन्याय का? २०१४ मध्ये राज्यात एकट्याच्या बळावर सरकार आले. विरोधी पक्ष नेता मुखमंत्री होतो, असा संकेत आहे. मी मुख्यमंत्री झालो नाही, गोपीनाथ मुंडे हयात असते तर राज्याचे चित्र वेगळे असते, असे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यांना मुख्यमंत्री मिळाले खान्देशाला कधीच संधी मिळाली नाही? उत्तर महाराष्ट्राचे नशीबच असे आह.े भाऊसाहेब हिरे, रोहिदास दाजी, मधुकरराव चौधरी यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी आली अन् त्यांचे राजकारण संपविण्यात आले. तसेच माझ्यासोबत झाले.आज प्रकाशित झालेल्या पुस्तकात तुम्हाला पाहिजे ते नाही. ते येऊ घातलेल्या ‘नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान’मध्ये आहे. पेशव्यांच्या इतिहास तुम्हाला माहीत आहे. नानासाहेब फडणविसांच्या कारस्थानामुळे आनंदीबाईला ‘धरा’चे ‘मारा’ झाले. असेच माझ्यासोबत ‘ध’चा ‘मा’केला गेला. चुकीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांमध्ये धमक असते. ती धमक माझ्यात आहे आणि तुम्ही माझी शक्ती आहात’ असे त्यांनी सांगितले.खासदार रक्षा खडसे आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, जि.प. ध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानंद चेअरमन मंदा खडसे, माजी आमदार चैनसुख संचेती, गुरुमुख जगवाणी, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, महंत प्रभाकरशास्त्री महाराज, जिल्हा बँकेच्या चेअरमन अॅड.रोहिणी खडसे खेवलकर ,मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा नजमा तडवी, बोदवड नगराध्यक्षा साजेदा शेख, सावदा नगराध्यक्ष, पुस्तकाचे लेखक डॉ.सुनील नेवे, अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
लोक सांगतात, नाथाभाऊचं काही अडकलं असेल म्हणून पक्ष सोडत नाही, माझा जीव पार्टीसोबत आहे- एकनाथराव खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 3:25 PM
मुखमंत्री फडणवीस दमानिया यांना वेळ देत होते. भेटत होते. पण मला भेटण्यासाठी वेळ देत नव्हते. याचे पुरावे आहेत.
ठळक मुद्दे‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचे आॅनलाईन प्रकाशनआमचा मुख्यमंत्री ड्रायक्लिनर होता, सरकारमध्ये कोणावरही आरोप झाले की लगेच क्लिनचिट द्यायचा, मी निर्दोष असताना क्लिन चिट दिली नाहीदेवेंद्र फडणविस दमानिया यांना वेळ देत होते, पण मला नाहीनाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही, स्वस्थ बसणारा नाहीपक्षाच्या नेत्याकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार