पेट्रोल-डिझेलचा खप १५ ते २० टक्क्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:06+5:302021-06-01T04:13:06+5:30

चाळीसगाव शहरात दरवाढीनंतर सोमवारी एक लीटर पेट्रोलचा भाव १०० रुपये ४९ पैसे व एक लीटर डिझेलचा भाव ९१ रुपये ...

Petrol-diesel consumption fell by 15 to 20 per cent | पेट्रोल-डिझेलचा खप १५ ते २० टक्क्यांनी घटला

पेट्रोल-डिझेलचा खप १५ ते २० टक्क्यांनी घटला

Next

चाळीसगाव शहरात दरवाढीनंतर सोमवारी एक लीटर पेट्रोलचा भाव १०० रुपये ४९ पैसे व एक लीटर डिझेलचा भाव ९१ रुपये ०७ पैसे होता. पेट्रोल-डिझेलची दरवाढ व कोरोनामुळे वाहतुकीवर शासनाने आतापर्यंत निर्बंध लावलेले नसल्याचे सांगण्यात आले.

इंधन दरवाढीमुळं सामान्यांचं तर कंबरडं मोडलंय. पूर्वी गाडीची टाकी फुल्ल करणाऱ्या लोकांचा एक वर्ग होता. हा वर्ग आता कमी झालाय. गरजेपुरतं पेट्रोल टाकणाऱ्यांची संख्या वाढलीय. लोक गाडीत पेट्रोल डिझेल भरताना दहावेळा खिसा चाचपून पाहतायत. पेट्रोल जेव्हा साठ-सत्तर रुपयांच्या घरात होतं तेव्हा पन्नासचे पेट्रोल टाकून गावभर फिरणारी तरुण मंडळी होती. पेट्रोलनं जेव्हा नव्वदी गाठली, तेव्हापासून ही तरूण मंडळी जवळपास गायब झालीय. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यानंतर त्याचा इंधनाच्या विक्रीवर परिणाम झालाय.

पेट्रोल डिझेलची विक्री घटल्याचं पेट्रोलपंप चालक सांगतात. बिनाकामाचे गावभर गाडी घेऊन फिरणाऱ्यांची संख्या कमी झालीय. गाडीचं काम असेल तरच घराबाहेर गाडी काढू असं म्हणणारे वाढलेत. त्यामुळं वाहनं आता रस्त्यावर कमी आणि पार्किंगमध्येच जास्त दिसू लागली आहे.

कोट

पेट्रोल-डिझेलचा भाव ऑनलाईन सिस्टिमने आम्हाला कळतो. आधीच लॉकडाऊनमुळे सेलवर परिणाम झाला आहे. त्यात दरवाढीची भर पडली. या दरवाढीमुळे पंधरा ते वीस टक्क्यांची घट आहे. त्यामुळे या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

-चरण बजाज, पंपचालक, चाळीसगाव

Web Title: Petrol-diesel consumption fell by 15 to 20 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.