हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात गायीचा पाडला फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:19 AM2021-09-21T04:19:06+5:302021-09-21T04:19:06+5:30
नांदेडपासून पूर्वेकडे तीन कि.मी. अंतरावर घुरखेडा शेती शिवार आहे. याचा मोठा भाग तापी व गिरणा नदीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये येतो. ...
नांदेडपासून पूर्वेकडे तीन कि.मी. अंतरावर घुरखेडा शेती शिवार आहे. याचा मोठा भाग तापी व गिरणा नदीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये येतो. सततच्या पावसामुळे बहुसंख्य पशुपालक शेतकरी आपली गुरे-ढोरे दिवसभर चारून रात्री घरी न आणता शेतामध्येच बांधून ठेवत असतात.
दरम्यान, या भागात कोणत्या तरी हिंस्र प्राणी वावरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. १८ रोजी रात्री देविदास बाबूराव कोळी यांच्या, तर त्याआधी जर्नादन एकनाथ गोसावी यांच्या गायीच्या वासरांवर हल्ला करून फडशा पाडला. जवळच त्या अज्ञात हिंस्त्र प्राण्याच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत. या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, २० रोजी या भागाला वनपाल पी. जे. सोनवणे, ए. व्ही. साळुंखे, वनरक्षक डी. जे. पाटील, क्षीरसागर यांनी भेट देऊन मृत गायीच्या वासराचा पंचनामा केला. घटनास्थळावरील हिंस्त्र प्राण्याच्या पायांचे ठसे बघता ते बिबट्याचे असावेत असा अंदाज वनविभागाच्या पथकाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
200921\1624-img-20210919-wa0065.jpg
हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात ठार झालेले गायीचे वासरू