खड्डे न भरल्याने भाजप नगरसेवकाने अभियंत्याच्या लगावली कानशिलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 9:16 PM
भुसावळ : खड्डयात ढकलण्याचाही केला प्रयत्न
भुसावळ : शहरातील अमृत योजनेतंर्गत रस्ते खोदण्यात आले आहेत. दिनदयाल नगरातील खड्डे बुजण्यात यावेत, यासाठी वारंवार सूचना देऊनही त्याची दखलही न घेतल्याने भाजपचे नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी संबंधित योजनेचे अभियंता नितीन चौधरी यांना कानशीलात लगावली आणि खड्ड्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजता दिनदयाल नगरात घडली.शहरातील अनेक भागात गेल्या पंधरा दिवसांपासून खड्डे खोदण्यात आले आहेत. हे खड्डे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. प्रभाग क्रमांक २० मध्ये गेल्या आठ दिवसांपासून रस्त्याच्या मध्यभागी खड्डा खोदण्यात आला होता. त्यामुळे दिनदयाल नगर परिसरातील दोन -तीन नागरिक खड्ड्यांमध्ये पडले होते. त्यामुळे हे काम तातडीने करून खड्डा बुजवावा अशी मागणी येथील सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक ठाकूर यांनी तीन दिवसापूर्वी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना केली होती. मात्र हात जोडून देखील अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने नगरसेवक ठाकूर यांनी अभियंता चौधरी यांना या खड्ड्यात ढकलण्याचा प्रयत्न करून कानशिलात लगावली. दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून तक्रार मात्र दाखल वाॅर्डात बऱ्याच दिवसापासून खड्डे खोदण्यात आले आहेत. अमृत योजनेचे अधिकारी नितीन चौधरी व वराडे यांना मंगळवार रोजी हात जोडून विनंती केली होती. मात्र तरीही त्यांनी खड्डे बुजवले नाही. त्या खड्ड्यांमध्ये नागरिक पडत होते. त्यामुळे जनसेवक म्हणून मला हे पाऊल उचलावे लागले. - महेंद्रसिंग ठाकूर नगरसेवक, भुसावळ विषय फारसा मोठा नाही. किरकोळ वाद झाला. आम्ही आज त्या परिसरातील बहुतांशी खड्डे बुजवले आहेत. रविवारपर्यंत पूर्ण काम करण्यात येईल.- नितीन चौधरी, अभियंता, अमृत योजना